तारखेडा बुद्रुक येथे संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी.

पाचोरा-
संत गाडगे महाराज यांची जयंती तारखेडा बुद्रुक येथे अतिशय आनंद व उत्साह वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी गोपाल उर्फ यशदादा मांडोळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती व गाडगे महाराज जयंती निमित्त तारखेडा बुद्रुक येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

यावेळी मोहनराव नारायणा नेत्रालय यांचे विशेष सौजन्य लाभले.याप्रसंगी डॉ. बापू सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करत महापुरुषांची जयंती सामाजिक उपक्रम करून सुद्धा साजरी करण्यात येते एक असा नवा संदेश या उपक्रमाद्वारे देण्यात आला.

याप्रसंगी सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक दादासो डॉ. स्वप्निल पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय बापूसो डॉक्टर भरत पाटील,पाचोरा येथील धोबी(परीट) समाजाचे पदाधिकारी नागराज बाबा अहिरे, डॉ.अविनाश राजपूत या मान्यवरांचा तारखेडा येथे स्वागत, सत्कार करण्यात आला.या शुभप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, आर.आर पाटील, धनराज पाटील, अरुण बागुल, दिलीप वसंत पाटील, तारखेडा खुर्द चे माजी सरपंच राजेंद्र पाटील, नाना विठ्ठल पाटील, बापू दत्तू पाटील,पंडित मांडोळे, परशुराम मांडोळे, संतोष मांडोळे, निखिल मांडोळे, सोमनाथ पाटील, धनंजय भास्कर पाटील, समाधान शांताराम पाटील, सागर मोरे, अक्षय अहिरे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.




