अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे विविध मागण्यांसंदर्भात आगार प्रमुख यांना निवेदन

पाचोरा-
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांतसचिव डॉ. अनिल देशमुख यांचे मार्गदर्शनात पाचोरा एसटी डेपो मध्ये प्रवाशी सोय,सुविधा सवलती, बंद असलेली पाणपोई सुरू करणे , डेपो मध्ये सर्वत्र पुरेशी वीज आणि पंखे व्यवस्था , महिला प्रवाशांच्या अंगावरील सोनेचोरी, पॉकेटमारी सारख्या वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी CCTV संख्या वाढविणे, आगार परिसरात सुशोभीकरण स्वच्छता, पार्किंग सुविधा, लांब पल्ल्याच्या बसेस मध्ये वाढ करणे, ज्येष्ठ नागरिक, पुरुष महिला, अपंग व्यक्ती, शालेय विद्यार्थांसाठी वेळेवर बस सुविधा सवलती, महिला ,मुलींना हाप तिकीटकार्ड, सह अमृत योजनेतील पंच्याहत्तरी ओलांडलेले नागरिकांच्या मोफत प्रवासाच्या पासेस वेळेवर उपलब्ध करून देण्यात यावे. नव्याने आलेल्या नियमातील NCMC कार्ड शासनाने ठरवून आणि निश्चित केलेल्या रकमेतच डेपोत आणि ठराविक ठिकाणी परवानगी दिलेल्या केंद्रांवर जादा रक्कम न घेता नियमात देणे. अधिकृत पत्रकारांना प्रवासात तिकीट दरात काही प्रमाणात सूट देण्यात यावी. अशा विविध मागण्या चे निवेदन आगार प्रमुख प्रकाश पाटील यांना दि. ९ मार्च २०२६ सोमवार रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत सचिव डॉ. अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण आबा सूर्यवंशी, तालुका परिवहन समिती तालुकाध्यक्ष सुरेश तांबे ,अ.भा. ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी दिले. तसेच प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने आगार प्रमुख यांनी स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेणे. जिल्हा स्तरावर मागण्या पोहोचवून पाठपुरावा करण्याच्या सूचना ग्राहक पंचायतचे पदाधिकारी यांनी केल्या.




