जळगाव जिल्हा

नांद्रा येथे शॉर्टसर्किटमुळे काढणीवर आलेला गहू पिक जळून खाक,वीज वितरणच्या भोंगळ कारभाराविषयी शेतकऱ्यांने व्यक्त केला संताप

पाचोरा-

तालुक्यातील नांद्रा येथील शेतकरी राहुल देविदास सूर्यवंशी यांच्या गट क्रमांक 278/2/1 शेतात सुमारे तीन एकर शेतात गहू या पिकाची पेरणी केली होती व आता ऐन काढणीला आलेला गहू पिकाचा हाता तोंडाशी आलेला घास शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण जळून खाक झाल्याने त्त्यांचा  तो घास हिरावला जाऊन सुमारे 50 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. गट क्रमांक 278/2/1 येथे संपूर्ण पेरणी केलेला पिवळा होऊन सुकून काढणीला आलेला गहू  हार्वेस्ट मशीन मिळत नसल्यामुळे त्यांची आठ दिवसापासून गहू काढण्यासाठीची लगबग सुरु होती व त्याच लगबगीमध्ये आज मात्र वीज वितरण्याच्या  त्यांच्या शेतातून गेलेल्या लोंबकळलेल्या असलेल्या तारांच्या शॉर्टसर्किटमुळे दोन एकरच्या जवळपास संपूर्ण गहू जळून खाक झाल्याचे शेतकरी राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी जळालेल्या शेतात वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अनिकेत सावळे, लाईनमन सागर पाटील सह इतर कर्मचारी यांनी प्रथम दर्शनी झालेल्या नुकसान पिकाची पाहणी केली  व पुढील पंचनामासाठी वीज वितरणाचे वरिष्ठ अधिकारी  येणार असल्याचे सांगितले यावेळी शेतकरी राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले की, त्यांच्या शेतातील गेलेल्या तारा डोक्याच्या वर हाताला लागतील अशा स्थितीत बऱ्याच दिवसापासून आहेत यासंदर्भात वीज वितरण कंपनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी त्या लोम्बकलेल्या तारांना ताण देऊन वर करण्यासाठी त्यांनी विनंती वजा सूचना तोंडी दिल्याचे सांगितले  परंतु ऐन उष्णतेच्या दाहकतेमध्ये एक छोटीशी शॉर्ट सर्किट ची ठिणगी या शेतकऱ्याचं संपूर्ण स्वप्न जळण्यास कारणीभूत ठरली असून झालेल्या नुकसानीचे योग्य ती रीतसर भरपाई मिळून या लोंबकलेल्या तारा दोन दिवसात सुस्थितीत न केल्यास माहेजी सब स्टेशनवर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकरी राहुल सूर्यवंशी यांनी याप्रसंगी दिला आहे.घटनास्थळी यावेळी शेतकरी वर्गामधून समाधान सूर्यवंशी, बाळू सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी शेतकरी उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!