क्राईमराज्य

7 महिन्यांची गर्भवती महिला,अशोक खरातचा आणखी एक किळसवाणा प्रकार समोर..

नाशिक-

नाशिकचा भोंदूबाबा स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात बाबत आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यांच्यावर एका २८ वर्षीय विवाहित महिलेनं लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आरोपी खरात सध्या पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. चौकशीत अनेक धक्कादायक आणि संतापजनक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात पोलीस खरातची चौकशी सुरू असतांना त्याचे आणखी दोन प्रकार उघडकीस आले आहेत.
एका घटस्फोटीत आणि एका गर्भवती महिलेनं आरोपी अशोक खरात विरोधात फिर्याद दाखल केली आहे. यातील गर्भवती राहिलेल्या महिलेनं तक्रारीत अशोक खरातने अमानुष पद्धतीने अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही गर्भवती महिला दुसरी तिसरी कुणी नव्हे तर आरोपी अशोक खरातचा निकटवर्तीय असलेल्या एका व्यक्तीची पत्नी आहे. आपल्या पत्नीवर अशाप्रकारे अत्याचार झाल्याचं समजल्यानंतर संबंधित ओळखीच्या व्यक्तीने सापळा रचून आरोपी अशोक खरातचे सगळे कांड उघडकीस आणलं आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा पीडितेच्या पतीनं दाखल केला आहे. पीडितेचा पती आरोपी खरातचा ओळखीचा आणि निकटवर्तीय मानला जातो. त्याने काही वर्षे खरातसोबत काम देखील केलं आहे. सन २०२३ मध्ये फिर्यादीची पत्नी (वय ३०) सात महिन्यांची गरोदर होती. संशयिताने बाळाचा जन्म सुरक्षित होण्यासह मुलगा होण्यासाठी विधी करण्याच्या बहाणा करत पीडितेला कॅबिनमध्ये बोलावलं.यावेळी आरोपी खरातने फिर्यादीला कॅबिनबाहेर पाठवून, लाईट बंद करून, मंत्रांच्या नावाखाली संशयिताने पीडितेवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग केला. ही घटना पीडितेच्या पतीला समजल्यानंतर त्याने खरातविरुद्ध वेळोवेळी सबळ पुरावे संकलित केले. हे खरातला समजल्यावर त्याने फिर्यादीसह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली, असेही फिर्यादीत म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!