क्राईमराज्य

नाशिक!लग्न करुन आणली लाखोंच्या दागिन्यांसह रफुचक्कर झाली;

नाशिक-

हिरावाडीत राहणाऱ्या युवकाने नंदूरबार जिल्ह्यातील मुलगी सोबत विवाह केला. युवक व त्याची आई भाजीपाला खरेदीसाठी मार्केटमध्ये गेले असता, पत्नीने तिच्या साथीदारांसह घरातील १० लाखांचे सोन्याचे दागिने, रोकड, लग्नासाठी दिलेली रक्कमेसह सुमारे ११ लाख ६० हजार रुपये घेऊन पसार झाली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीसात त्यांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

हिंमत उर्फ आकाश पावरा ( रा. नवागाव पिंपरी, ता. शहादा, जि. नंदूरबार), दिपक पटेल, राहुल पटेल, पूजा पटेल (रा. करण चौफुली, ता.जि. नंदूरबार. मूळ रा. तोरणमाळ, ता. धडगाव, जि. नंदूरबार) अशी संशयितांची नावे आहेत. परंतु ही नावे खरी आहेत की नाही, याचा तपासही पोलीस करत आहेत.

प्रफुल्ल शांताराम भिडे (४५, रा. अण्णाज्‌ व्हिला, गायत्रीनगर, हिरावाडी) यांच्या फिर्यादीनुसार, कामकाजाच्या माध्यमातून त्यांची संशयित हिंमत पावरा यांच्याशी ओळख झाली असता त्यांनी लग्नासाठी मुलगी असल्यास सांगा, असे सांगितले. त्यानुसार, पावरा याने त्यांना करण चौफुली येथे एक मुलगी असल्याचे कळविले.

त्यामुळे ८ मार्च रोजी भिडे हे मुलगी पाहण्यासाठी करण चौफुली (नंदूरबार) येथे गेले. त्यावेळी पावरा याने मुलीचे भाऊ दिपक पटेल व राहुल पटेल यांची भेट घालून दिली. त्यानंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर संशयित राहुल व दिपक यांनी लग्नापूर्वी दीड लाख रुपये देण्याची अट घातली.

भिडे यांच्याकडे रोख पैसे नसल्याने त्याने तेथेच तीन दिवस थांबून एटीएममधून काढून ५० हजार संशयितांना दिले. त्यानंतर संशयितांनी पावरा परंपरा नुसार तपूजा पटेल हिच्याशी विवाह लावून दिला. भिडे, नववधू पूजा व तिचा भाऊ राहुल हे नाशिकला हिरावाडीत आले.

घरी आल्यानंतर ८० हजार पटेल यास दिले. उर्वरित २० हजार रुपये कोर्टमॅरेजनंतर देण्याचे ठरले. राहुल पटेल संशयित पूजा हिचे कागदपत्रे घेण्यासाठी पुन्हा करणचौफुली (नंदुरबार) येथे जात असल्याचे सांगून गेला.
या बाबत अधिक तपास पंचवटी पोलीस करीत आहेत

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!