कासोदा सरपंचपदी पुरुषोत्तम उर्फ बंटी चौधरी यांची तर उपसरपंच पदी अरशदअली यांची बिनविरोध निवड.
कासोदा ता. एरंडोल-
कासोदा येथील सरपंच महेश पांडे यांनी आपल्या पदाचा दिलेला शब्द पाळून अडीच वर्षात राजीनामा दिला त्यामुळे त्यांचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु राजीनाम्यानंतर काल २० ऑक्टोबर रोजी सरपंच निवडीच्या वेळेस सरपंच पदासाठी पुरुषोत्तम उर्फ बंटी चौधरी यांच्या एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अध्यक्ष अधिकारी शिवाजीराव गुडगुडे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री चव्हाण यांनी बंटी चौधरी यांची बिनविरोध निवड जाहीर केली. अरशद अली यांचीही यापूर्वी उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली होती त्यानंतर सरपंच बंटी चौधरी व उपसरपंच अरशद अली यांची कासोदा ग्रामपंचायत मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. या प्रसंगी निवडी प्रसंगी सर्वोच्या सर्व १७ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित. सरपंच निवडीनंतर ग्रामपंचायत पासून ते संपूर्ण गावात त्यांची ढोल ताशेच्या गजरात गुलाल उधळत सरपंच व उपसरपंच यांची मिरवणूक काढण्यात आली.
सरपंच बंटी चौधरी यांना राजकारणाचा वसा त्यांचे वडील भास्कर भाऊ चौधरी यांच्याकडून मिळाला तर उपसरपंच अरशद अली यांना त्यांचे वडील स्व , मुख्तार अली यांच्याकडून वसा मिळाला
त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
प्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी सरपंच महेश पांडे, जिल्हा दूध संघाचे संचालक दगडू चौधरी, भास्कर चौधरी, व ग्रामविकास अधिकारी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य पत्रकार बंधू गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते प्रसंगी कासोदा पोलीस स्टेशनकडून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.