पाचोऱ्यात शिंदे गटाला धक्का शहरातील कार्यकर्त्यांचा अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश
पाचोरा-
पाचोरा शहरातील एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ले समजला जाणारा भवानी नगर भागातील असंख्य शिवसैनिकांनी (शिंदे गट) आज आमदार किशोर पाटील यांना कायमचा जय महाराष्ट्र करत विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश करून आमदारांना जोरदार धक्का दिल्याचे मानले जात आहे.
आगामी निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पार्टी कडुन एका-पाठोपाठ एक होणारे प्रवेश बघुन पाचोरा शहरात आपली ताकत वाढविण्यास सुरूवात केल्याचे चर्चिले जात आहे.तसेच येणाऱ्या आगामी काळात देखील शहरासह ग्रामीण भागातील मोठे-मोठे प्रवेश होतील असे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
यावेळी प्रदीप पाटील,निलेश मोरे,पिंटू भाऊ पाटील,दिनेश पाटील, रोहित पाटील,शुभम पाटील,भूषण पाटील,दीपक पाटील,लकी पाटील, सोनू शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला याप्रसंगी भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे,रमेश वाणी,संजय पाटील,दीपक माने,समाधान मुळे ,जगदीश पाटील,वीरेंद्र चौधरी,राहुल गायकवाड,विकी बाविस्कर,भैय्या चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.