शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा मध्ये कन्या पूजन सोहळा उत्साहात
पाचोरा –
येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गा पूजन व कुमारी पूजन सोहळा मोठ्या भक्ती भावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने नवरात्रीच्या नवमी या पावन तिथीस दुर्गा मातेच्या प्रतिमेचे पूजन तसेच शाळेतील नऊ कुमारीका कन्या पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गिरणाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. तात्यासाहेब पंडितराव शिंदे, सचिव ॲड. जे.डी. काटकर , नीरज मनोत, सौ. पूजाताई अमोल शिंदे, शाळेचे प्राचार्य डॉ. विजय पाटील सर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
मान्यवरांच्या हस्ते यथोचित विधिवत पद्धतीने दुर्गा मातेचे प्रतिमा पूजन, शाळेतील नऊ कुमारीका कन्या पूजन करण्यात आले. शाळेचे अध्यक्ष तात्यासो पंडितराव शिंदे, सौ. पूजाताई अमोल शिंदे दुर्गा मातेची आरती करण्यात आली.
शाळेचे सर्व प्रांगण भक्तीमय वातावरणाने दुमदुमून निघाले शाळेचे प्राचार्य डॉक्टर विजय पाटील यांनी नवरात्रीच्या प्रत्येक नऊ दिवसाचे महत्त्व व देवीच्या रूपाचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेच्या ब्रीद वाक्याचे नेहमीच पालन केले जाते. ग्लोबल एज्युकेशन विथ इंडियन व्हॅल्यूज भारतीय संस्कृतीची जपवणूक करण्यासाठी प्रत्येक येणारा सण- उत्सव अतिशय आनंदाने साजरा केला जातो. हे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचा अनमोल वारसा जपण्यासाठीचा संदेश देत असतात. शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय तात्यासाहेब पंडितराव शिंदे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच आग्रही असतात. शाळेतील विविध उपक्रम राबविण्यासाठी कार्यक्रमांसाठी ते सदैव प्रेरणा देतात. आरती नंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद व खाऊचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.