पाचोऱ्यात भर पावसात मराठा आरक्षणासाठी बहुजनांचा जन आक्रोश मोर्चा.


पाचोरा(संपादक कुंदन बेलदार)
लोकशाही मार्गाने संविधानिक आरक्षणाची मागणी करणारे जालन्यातील बहुजनांवर दडपशाही शासनकर्त्यांनी केलेला लाठी हल्ला हा अत्यंत अमानुष व निंदनीय होता. महिला, लहान मुलं व म्हातारे कोणालाही सोडलं नाही. आया बहिणीचे रक्त सांडले. लाठी हल्लावरच ते थांबले नाहीत तर दहशतवाद्यांना मारण्यात येतात ते लोखंडी छरै प्लास्टिक गोळ्या, रबरी गोळ्या, अश्रुधारा असा वापर सरास करण्यात आला म्हणून आज पाचोरा येथे भारत डेअरी थांबा कृष्णापुरी पासून सर्व समाज, सर्व पक्ष आणि सर्व समाज बांधव यांनी मिळून जन आक्रोश मोर्चा काढला व हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येऊन माननीय तहसीलदार महोदय पाचोरा यांना निवेदन देऊन थांबला या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी व उपजिल्हाप्रमुख पाचोरा उद्धव भाऊ मराठे सर्व पदाधिकाऱ्यांसोबत व कार्यकर्त्यांसोबत सहभागी झाले याप्रसंगी उपजिल्हा संघटिका तिलोंत्तमा मौर्य, जयश्री येवले, उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर चौधरी, पप्पू राजपूत, सुनील पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, युवराज धोबी, चंद्रकांत पाटील, अभिषेक खंडेलवाल, वैभव पाटील, रवींद्र चव्हाण, बंडू मोरे, नाना वाघ, संतोष पाटील सर, राजेंद्र गायकवाड, एडवोकेट किशोर पाटील, गोकुल गांगुर्डे, धरमसिंग पाटील उपस्थित होते.




