जळगाव जिल्हा

एरंडोल तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 26 ऑक्टोबर रोजी अमरण उपोषण

कासोदा ता.एरंडोल (प्रतिनिधी)


एरंडोल तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एरंडोल पंचायत समिती येथे अनुसूचित जाती व जमाती च्या योजनांची अंमलबजावणी न करणारे अधिकारी यांची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी. तसेच तालुक्यातील ग्राम पंचायत १४,१५ वा वित्त आयोगाचा निधी कृती आराखडा प्रमाणे अनुसूचित जाती व जमाती च्या वस्ती मध्ये विकास कामे न करता ते इतरत्र निधी वापरला जात आहे. दलित वस्ती सुधार योजना इस्टिमेट प्रमाणे कामे होत नाहीत. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेले कामे शासन नियमानुसार कामं केली जात नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीने दरवर्षी ग्राम तून १५ % टक्के निधी मागासवर्गीयांसाठी खर्च करण्याचे शासनाचे आदेश असताना वसुली होत नाही.

असे कारण सांगून जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. तसेच अनुसूचित जाती व जमाती च्या योजनांची अंमलबजावणी योजनेच्या कालावधीत होत नाही. त्याचप्रमाणे मौजे. फरकांडे येथील ग्राम पंचायत प्रशासनाने कृती आराखडा प्रमाणे अनुसूचित जाती व जमाती च्या वस्ती मध्ये विकास न करता इतर ठिकाणी निधी खर्च करण्यात आला आहे. संबंधित दोषी विरूद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा.अशा विविध समस्या सोडविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एरंडोल पंचायत समिती येथे दिनांक २६/१०/२०२३ रोजी ठिक ११वाजे पासून प्रशासनाचे लक्ष वेधून उपोषण करण्यात येत आहे. यावेळी रिपाईचे राज्य उपाध्यक्ष रमेश भाऊ मकासरे, जळगाव जिल्हा अध्यक्ष राजू भाऊ सुर्यवंशी , जिल्हा अध्यक्ष जळगाव लोकसभा क्षेत्र आनंद खरात साहेब, भडगाव तालुकाध्यक्ष अण्णा साहेब खेडकर, पाचोरा तालुका अध्यक्ष विनोद अहिरे, जळगाव महानगर अध्यक्ष अनिल भाऊ अडकमोल, पारोळा तालुका अध्यक्ष जितेंद्र केदार, राजू भाऊ जावरे पारोळा अमळनेर तालुका अध्यक्ष यशवंत भाऊ बैसाने, जळगाव युवा अध्यक्ष मिलिंद सोनवणे, जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष भगवान भाई सोनवणे, चोपडा तालुका अध्यक्ष भिमराव रायसिंगे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष विक्रम हिंरोळे, यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारथे, रावेर तालुका अध्यक्ष विकी तायडे, एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीण बाविस्कर, तालुका सचिव देवानंद भाऊ बेहेरे, उपतालुकाप्रमुख सुनिल भाऊ खोकरे, भिमराव सोनवणे,किरन पानपाटील,विजय मोरे, महेंद्र मोरे,मौसिन भाई, गजानन पाटील, सिताराम मराठे, देविदास जाधव, जितेंद्र वाघ, आनंद सुर्यवंशी, भाऊसाहेब पानपाटील, रतन अडकमोल विजय पाटील,मनसुर पठाण, इम्रान खान, विश्व नाथ बिऱ्हाडे, प्रतिक सपकाळे जळगाव, विजय पवार, यांची उपस्थिती राहणार आहे. तरी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे जाहीर आव्हान रिपब्लिकन पक्षांचे वतीने करण्यात येत आहे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान एरंडोल तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ बाविस्कर यांनी केले आहे

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!