जळगाव जिल्हा

दिपावली पार्श्वभुमीवर प्रवाशांची लक्झरी मालकांकडून होणारी लुट थांबवण्यासाठी भरारी व कारवाई पथकाची संदीप महाजन यांची मागणी

जळगाव-

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी करू नये. भाडे आकारणी बाबतचा तक्ता प्रत्येक ट्रॅव्हल्स कार्यालयाच्या बाहेर लावण्यात यावा.‌ असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे. खाजगी प्रवासी बसेसची सेवा पुरविणारे वाहतूकदारांनी संबंधित मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने वाहतूक सेवेकरीता आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या कमाल दीडपट पर्यंत भाडे आकारता येईल. त्यापेक्षा अधिक भाडे आकारणी करणाऱ्या खासगी बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश मोटार वाहन निरीक्षक यांना देण्यात आलेले आहेत जळगाव व तालुक्या स्तरावरून खासगी बसेस या पुणे, मुंबई, नागपूर, सुरत, अहमदाबाद यासह अनेक ठिकाणी ये-जा करीत असतात. या कार्यालयाद्वारे खासगी ट्रॅव्हल्स मालकांना प्रवाशांकडून किती भाडे आकारावे. याबाबतचा तक्ता तयार करुन प्रवाशांच्या सोयीकरीता प्रत्येक खासगी ट्रॅव्हल्स कंपनी कार्यालयात फलक माहिती लावणेबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अधिक भाडे आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा आढळून आल्यास अशा वाहतूक पुरवठादारांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत खटला दाखल करण्यात येणार आहे, असा अभिनंदनीय बाब असलेला जनतेच्या हिताचा इशारा‌ जळगाव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.लोही यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिलेला असला तरी या प्रकरणी
पाचोरा येथील संदीप महाजन यांनी निवेदनाव्दारे मागणी केली आहे की जळगावसह सर्व तालुकास्तरावरून अनेक ठिकाणी लांब पल्ल्याच्या ठिकाणी लक्झरी बसेस जातात मात्र यांच्या एकाही कार्यालयाजवळ दिवाळीच्या सिझन मध्ये प्रवासी भाडे दर फलक लावण्यात आलेला नाही काही ठिकाणी तर कोठेतरी एखाद्या कोपऱ्यात नाममात्र कार्यालय दाखवून लक्झरी गाडी थांबा मात्र वेगळया ठिकाणी असतो तेथे एजंटला उभे करून सर्रास अवाजवी भाडे आकारणी केली जाते किंबहुना ऑनलाईन बुकींग सुविधा असली तरी ती देखील सिट फुल दाखवली जाते कोणीही योग्य भाडे आकारणी करावी अशी मागणी केली तर त्यांना जागा नाही असे सांगून टाळले जाते मात्र ज्या प्रवाशाने गरजेपोटी लक्झरी मालक किंवा एजंटच्या मनाप्रमाणे पैसे दिले तर त्यांना लगेच त्यांच्या सोई प्रमाणे सिट देण्यात येते
अशा होणाऱ्या लुट प्रकरणी जळगावसह महाराष्ट्रातील प्रत्येक जिंल्ह्यात मा.जिंल्हाधिकारी,मा.जिंल्हा पोलीस अधिक्षक, मा.उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथक व तालुकास्तरीय शासकीय पथक नियुक्ती करून योग्य ते नियम – अटी – निकष निश्चित करण्यात यावे सदर नियम अटीचे उल्लंघन होत असेल अशा लक्झरी मालक-चालक,एजंट यांच्यासह लक्झरीवर देखील स्पॉट कारवाई करण्यात यावी जेणे करून प्रवाशांची लुट होणे पासुन वाचेल अशी मागणी पत्रकार संदीप महाजन यांनी महाराष्ट्राचे मा. राज्यपाल, मा.मुख्यमंत्री,मा. उप.मुख्यमंत्री यांच्यासह संबंधित प्रशासनाकडे केली आहे याची पत्र देखील देशपातळीवरील वरीष्ठस्तरांवर मान्यवरांना देण्यात आली.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!