वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा यांच्या वतीने मोफत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न.
पाचोरा-
पाचोरा येथील वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व वृंदावन फाऊंडेशन यांच्या वतीने पाचोरा-भडगाव सह ग्रामीण भागातील गोर गरीब रुग्णांसाठी आरोग्य शिबीर मोफत रक्त तपासणी शिबीर व प्रत्येक महिन्यात नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा वतीने आयोजीत करण्यात येते व या शिबीरा मार्फत मोठ्या संख्येने रुग्ण उपचाराचा लाभ घेतात.
असाच उपक्रम वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ.निळकंठ पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील
जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, मोंढाळे येथे मोफत रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरात इयत्ता 1 ली ते 7 वी च्या 111 विद्यार्थ्यांच्या रक्तगटाची मोफत तपासणी करण्यात आली.
शिबीराच्या ठिकाणी श्री.धनराज पाटील सर, डॉ.निळकंठ पाटील, श्री.ज्ञानेश्वर आखाडे, श्री.रविंद्र पाटील, श्री.संदीप जाधव, श्री.पंडीत गायकवाड (उपसरपंच), श्री.संदिप मानकर, श्री.नवीन पाटील (पो.पा.) श्री.एकनाथ सोनवणे (शा.व्य.स. सदस्य) श्री.दिनेश पाटील व शिक्षकवृंद उपस्थित होते.