पाचोरा-भडगाव तालुक्यात आमदार किशोर पाटलांची दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.
पाचोरा-
पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळसदृश परीस्थती असल्याने दोन्ही तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार कीशोर पाटील यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे आज मुबंईत भेट घेऊन केली. त्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले.
पाचोरा व भडगाव तालुक्यात अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामाची दैना झाली आहे. उत्पन्नात पन्नास टक्क्यापेक्षा अधिक घट झाली आहे. त्यामुळे शेतकर्याची दिवाळी अंधारात आहे. त्यापाश्वभुमिवर दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
आमदारांनी घेतली मंत्र्याची भेट
दोन्ही तालुक्याची परीस्थीती पाहता आज आमदार कीशोर पाटील पाटील यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन दोन्ही तालुक्यातील दुष्काळाबाबत वस्तुस्थीती सांगीतली. त्यामुळे दोन्ही तालुक्यात शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदारांनी केली. त्यावर मंत्री अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले. यापुर्वीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगीतले.
25 टक्के विम्याची अग्रीम मिळणार
दरम्यान भडगाव तालुक्यातील 18 हजार शेतकर्याना पंतप्रधान पीक विम्याची 25 अग्रीम रक्कम ही दिवाळीत मिळणार आहे. यात जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यातील 1 लाख,43 हजार 317 शेतकऱ्यांना 76 कोटी 40 लाख 4 हजार 607 नुकसान भरपाई पोटी मंजुर झाले आहे. ते शेतकर्यांना दिवाळीपुर्वी मिळणार आहे. राज्यातील लोकप्रतिनिधींचा याबात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे विमा कंपन्यांनी अग्रीम रक्कम देण्याचे मान्य केल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले.
11 जुनच्या भरपाईबाबत बैठक
11 जुन 2019 ला भडगाव तालुक्यात विशेषत: गिरणा पट्ट्यात वादळी पावसाने शेतकर्याचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र त्या नुकसानग्रस्त शेतकर्याना अद्याप ही भरपाई मिळालेली नाही. त्याबाबत आमदार किशोर पाटील यांनी अधिवेशनात ही आवाज उठवला होता. शेतकरी ही उपोषणाला बसले होते. याबाबत उद्या मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. आमदार कीशोर पाटील यांनी खास बाब म्हणून मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
प्रतिक्रीया
पाचोरा-भडगाव तालुक्यात खरीपाची अक्षरश: माती झाली आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांची भेट घेऊन दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कुठल्याही परीस्थीतीत दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत मी ठाम आहे.
-किशोर आप्पा पाटील
आमदार -पाचोरा-भडगाव