Blogजळगाव जिल्हा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विशेष कृती दल समितीवर अँड अविनाश भालेराव यांची निवड.
पाचोरा-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमधील दुर्लक्षित जाती समूहांच्या लोकांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष कृती दल समितीची स्थापना करण्यात आली आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील अध्यक्षांसहित एकूण 14 नेत्यांची निवड करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष पाचोर्याचे माजी नगरसेवक अँड अविनाश मुकुंदराव भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.