पाचोरा पोलिस स्टेशन व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांची भेट वार्षिक निरिक्षणाचा घेतला आढावा.
पाचोरा-
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी पाचोरा पोलिस स्टेशन व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयास भेट देवुन वार्षिक निरिक्षणाचा आढावा घेतला. याप्रसंगी चाळीसगाव परिमंडळाचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पाचोरा भागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, पोलिस निरीक्षक राहुल खताळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, महिला पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे, पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, पो. उ. नि. जितेंद्र वल्टे हे उपस्थित होते.
१७ नोव्हेंबर रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांचे ११ वाजता पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आगमन झाले. यावेळी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांना मानवंदना दिली. तद्नंतर पाचोरा पोलिस स्टेशनमधील वर्षभरातील गुन्हे निरगती, प्रतिबंधात्मक कारवाह्या, कायदा व सुव्यवस्था व इतर बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच पाचोरा पोलिस स्टेशनमधील लेखनिक कक्ष, दुय्यम अधिकारी कक्ष, संगणक कक्ष, गार्ड रुम, वायरलेस कक्ष, पुरुष व महिला लाॅकप, बारनिशी कक्ष, गुन्हे शोध पथक कक्ष, मुद्देमाल कक्ष, गोपनीय कक्ष, क्राईम रायटर कक्ष, पोलिस आराम कक्ष याठिकाणी पाहणी केली. तसेच पाचोरा पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन परिसरातील माहिती जाणून घेतली. यासोबतच पाचोरा भागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील वार्षिक निरिक्षण डॉ. बी. जी. शेखर यांनी केले. याठिकाणी जामनेर, पिंपळगाव (हरेश्वर) व पहुर पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन आढावा घेतला. या वार्षिक निरक्षण आढावा दरम्यान डॉ. बी. जी. शेखर यांनी समाधान व्यक्त केले असुन पोलिस प्रशासनास आवश्यक त्या सुचना दिल्या. या वार्षिक निरक्षण आढावा प्रसंगी पाचोरा पोलिस स्टेशनचे व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते.