जळगाव जिल्हा

मौजे बाळद बु.सरपंच बाबतीत अविश्वासाचा ठराव सदस्यांनी दिला तहसीलदारांना.

पाचोरा-

पाचोरा तालुक्यातील मौजे बाळद बु.येथील ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच बाबतीत अविश्वासाचा ठराव तहसीलदारांना समोर मांडला आहे.

सदर ठरावात सदस्यांनी असे म्हटले आहे की,आम्ही खालील सह्या करणारे मौजे बाळद बु. ता. पाचोरा जि. जळगाव या ग्रामपंचायत सदस्य तुम्हास निवेदन देतो की,

मौजे बाळद बु. ता. पाचोरा ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. सचिन भैयासाहेब सोमवंशी यांच्या विरुद्ध पुढील कारणासाठी अविश्वासाचा ठराव मंजूर मांडू इच्छितो,

१. ग्राम पंचायत उपसरपंच, सदस्यांना विश्वासात घेत नाहीत.

२. गावाच्या विकास कामांकडे लक्ष देत नाहीत.

३. ग्राम पंचायतीत येणाऱ्या पैशांचा हिशोब सदस्यांना दाखवत नाहीत.

४. ग्रामस्थांच्या अडचणी सोडवीत नाहीत.

५. नियमाप्रमाणे काम करीत नाहीत मनमानीप्रमाणे वागतात.

सरपंच हे मनमानी कारभार करत असून कुणा एकही ग्रामपंचायत सदस्यास विश्वासात न घेता सरपंच याच्याशी संघन मत करून आपल्या अधिकाराचा बेकादेशीर रित्या गैरवापर करीत आहे.

वर नमूद केलेली वस्तुस्थिती आमची माहितीप्रमाणे खरी असल्याने आम्ही जाहीर

करतो.

सदस्यांची नावे

१. दर्शन जयकुमार सोमवंशी (सदस्य)

२. राजेंद्र गिरधर पाटील

३. दिपाली कृष्णराव पवार

४. शिलाबाई रवींद्र झवर

५. रमेश विश्वनाथ सोमवंशी

६. अनिता दगडू पाटील

७ तात्यासाहेब प्रल्हाद सोनवणे

८. जयश्री विजय ठाकरे

या सदस्यांनी ठरावा वर सह्या केल्या आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!