लोहटार-सुलभ शौचालय योजनेत शासनाची दिशाभूल गैरव्यवहारा बाबत चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी.
पाचोरा-
तालुक्यातील लोहटार गावातील सुलभ शौचालय योजनेत शासनाची दिशाभुल करीत गैरव्यव्हार झाल्याने चौकशी होवून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे बाबत येथील गटविकास अधिकारी यांना तक्रार करून महीना उलटला तरी कोणतीही चौकशी अथवा कारवाही होत नसल्याने लोहटार ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याकडे धाव घेत तक्रार करून न्यायाची मागणी केली आहे.
पाचोरा तालुक्यातील लोहटार गावात शौचालय बांधण्यासंदर्भात २०१५ ते २०२२ या कालावधीत झालेल्या घोळासंदर्भात माहीती अधिकारातुन प्राप्त झालेली माहीती ही धक्कादायक आणी आश्चर्य चकीत करणारी होती.
या माहीती अधारे गावातील दिपक भदाणे, गोपाळ परदेशी,धनराज पाटील,सुनील चौधरी,नाना पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी तालुक्याचे प्रमुख अधिकारी गटविकास अधिकारी यांना तक्रार करून न्याय मागीतला होता.
माञ तालुक्यावर टाळाटाळ, उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे.त्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, आमचे लोहटार गावी केंद्र व राज्यशासन पुरस्कृत असुन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालये पाचोरा पंचायत समिती अंतर्गत मंजूर करून सन 2015 ते 2022 दरम्यान बोगस बनावट ये मृत व्यक्ती तसेच एकाच कुटुबांतील एकत्र कुटुंबातील सदस्यांच्या नावे सुलभ शौचालयाचे वैयक्तीक शौचालयाचे अनुदान लाटले आहे. त्यामुळे शासनाची फसवणुक होऊन आर्थिक गैरव्यव्हार मोठया प्रमाणात झालेला आहे. त्यासंदर्भात आम्ही माहीती अधिकारात सदर योजनेच्या लाभार्थ्यांची व अनुदानाची यादी प्राप्त करून शौचालय घोटाळा निदर्शनास आला आहे. तरी आपण सखोल चौकशी करून संबधित अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी लाभार्थी यांचेवर कायदेशीर करून दोषींवर शासकिय निधीचा अपहार संगमताने केल्या प्रकरणाची फौजदारी गुन्हे दाखल करावे ही विनंती गटविकास अधिकारी पंचायत समिती पाचोरा यांचेकडे 24 आक्टोंबर रोजी तकारअर्ज दाखल करून ही चौकशीची मागणी केली होती.
माञ सदरचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे.
सदर शौचालये आज स्थितीत अस्तीत्वात आहेत किंवा नाही याची खात्री करून बोगस लाभार्थ्यावर गुन्हे दाखल व्हावेत ही विनंती सदर गाव गटविकास अधिकारी पंचायत समिती पाचोरा यांच्या खोट्या अहवालावरून शासनाची दिशाभुल करून हगणदारीमुक्त गाव घोषीत केले आहे. मात्र तेथील स्थीती चौकशी अधिका-याकडून प्रत्यक्ष पहाणी करून करावी व दोषीवर कार्यवाही करावी अशी विनंती तक्रारी अर्जाद्वारे केली असुन अर्जासोबत लाभार्थ्यांची यादिही जोडली आहे.सदर तक्रारीची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे राज्यपाल,पालकमंञी ना. गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांना दिले आहे.याप्रकरणी जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी काय भुमीका घेतात याकडे लोहटार ग्रामस्थांसह तालुक्याचे लक्ष लागुन आहे.