“आमदार आपल्या दारी”उपक्रम अंतर्गत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन.
पाचोरा-
तालुक्यातील खाजोळा येथे आमदार आपल्या दारी उपक्रम अंतर्गय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व रस्त्याचे उद्घाटन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यासोबतच गावातील नागरिकांना विविध शासकीय योजना राबविल्या जातात त्या लोकांपर्यंत पोहचावीत म्हणून जागेवर अर्ज स्विकारण्यासाठी पंचायत समितीचे तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या मार्फत विविध योजना गावात राबविण्यात आल्या व जागेवर समस्यांचे निराकरण व अधिकारी कर्मचारी आदेश देऊन समस्या मार्गी लावा असे आदेश देण्यात आले.
त्या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी व जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, माजी नगरसेवक शितल भाऊ सोमवंशी, सोनू परदेशी, भैया भाऊ , अविनाश कूडे, गणेश देशमुख, तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच तसेच गावातील ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच, पोलीस पाटील,ग्रामपंचायत सदस्य व विविध विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन व सदस्य ग्रामसेवक,गावातील शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.