संविधान जनजागृती रॅली व अभिवादन सभा संपन्न.
पाचोरा-
पाचोरा येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर युवा फाउंडेशन चा वतीने आज संविधान दिनानिमित्त शहरातील सर्व सामाजिक संघटना,पक्षातर्फे संविधान दिनानिमित्त संविधान जनजागृती रॅली आणी अभिवादन सभा संपन्न झाली.
शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आज संविधान दिनानिमित्त शहरातील समविचारी सामाजीक संघटना पदाधिकारी व सर्व पक्षाचे पदाधिकार्यांनी एकञ येत संविधान दिन साजरा केला.
सर्व मान्यवरांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.हातात संविधान दिनाचे स्लोगन असलेले पोस्टर घेउन रॅली मा.ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याजवळ येउन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.तदनंतर रॅली छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आली.छ.शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर जनजागृती रॅली हुतात्मा स्मारक येथे आल्यावर रॅलीचे रूपांतर अभिवादन सभेत झाले.
यावेळी मान्यवरांनी संविधान दिनाचे महत्व,संविधातील तत्व आणी वर्तमानात सुरू असलेल्या घडामोडिंवर प्रकाश टाकला.या संविधान जनजागृती रॅलीत सचिन सोमवंशी, धनराज पाटील,विकास पाटील,प्रविण पाटील,सुनिल पाटील,खलिल देशमुख, दत्ताआबा बोरसे,फईम शेख,किशोर डोंगरे,अशोक मौरे,राजु अहिरे,दिपक तायडे,गजानन पाटील,नाना सोनवणे,आर.पी.बागुल,राजु र्खचाने,मिलिंद ब्राम्हणे,प्रदिप जाधव,जय वाघ,दादा आदिवाल,देविदास थोरात,भावराव पवार,ए.बी.अहारे,सिध्दार्थ खरे, अँड कैलास सोनवणे, अँड देविदास पाटील,आकाश खैरनार,विजय गायकवाड,आर.आर.सोनवणे,सुनिल भिवसने,यशवंत देहडे,मेजर संतोष कदम,दिपक वाकडे,अरविंद जगताप,संदिप जगताप,विश्वनाथ भिवसने,भिमराव खैरे,विक्की सिरसाठ, अँड अमोल म्हस्के,आकाश नन्नवरे,संगिता रत्नपारखे,लता सपकाळे,राकेश सपकाळे,सतिष सपकाळे,सचिदानंद मोरे,दिलीप बागुल,राजेंद्र ब्राम्हणे,सुमेध ब्राम्हणे,आदी उपस्थित होते.