जळगाव जिल्हा

350 वर्ष जुन्या परंपरा असलेल्या रथोत्सवाला प्रथमच मोठ्या संख्येने भाविकांची 32 खेड्यातून उपस्थिती-नगरदेवळ्यात रथोत्सव उत्साहात संपन्न.

पाचोरा-

तालुक्यातील नगरदेवळा येथील ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीमंत बालाजी महाराज रथोत्सव यावर्षी चैत्र शुद्ध त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त दिनांक सोमवार 27 रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता सजावट करून रथोत्सवाला प्रारंभ झाला यावेळी रथोत्सवाचे विधिवात पूजन श्रीमंत बाळासाहेब के एस पवार यांचे वंशज मार्फत करण्यात आले, यावेळी मोगरी धारकांचा देखील सन्मान बालाजी मंदिर संस्थान ट्रस्टच्या सदस्यांच्या वतीने करण्यात आला, वाणी गल्लीतून तरुणांच्या उत्साहामध्ये व्यंकटरमणा बालाजी च्या जय घोषाने अवघी नगरदेवळा नगरी दुमदुमली, गेल्या 350 वर्षापासून सुरू असलेली ही रथ उत्सवाची परंपरा दरवर्षी चैत्रशुद्ध कार्तिक पौर्णिमेला संपन्न होत असते ,या वर्षाच्या रथोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेले हिंदू मुस्लिम बांधवांचे सहकार्याने हा उत्सव पार पडला ,यात मुस्लिम बांधवांनी देखील रथावर झेंडूच्या पुष्पवृष्टीने रथाचे स्वागत केले, यावेळी रथाचे पूजन तालुक्याचे आमदार श्री किशोर आप्पा पाटील, तसेच तसेच माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ, तसेच आर ओ पाटील यांचे कन्या वैशालीताई पाटील, तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री अमोल शिंदे ,व नगरदेवळा जिल्हा परिषद बाळत गटाचे सदस्य श्री रावसाहेब पाटील ,तथा सरपंच सौ प्रतिक्षा किरण काटकर, तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरदार एस के पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यार्थी लेझिम पथक सादर करून सहभाग नोंदवून विधिवत पूजन केले

यावेळी वीज कंपनीचे कर्मचारी यांनी रथाच्या मार्गावरील विद्युत साठी व्यवस्थित सहकार्य करून आपले सेवा दिली, त्याचप्रमाणे नगरदेवळा व पाचोरा येथील पोलीस बांधवांनी खूप मोठे सहकार्य करून उत्सव आनंदात पार पाडला, ग्रामपंचायतचे सफाई कामगार यांनी रथोत्सवाच्या मार्गावरील सर्व घाण साफ करून अत्यंत व्यवस्थितरीत्या आपले कार्य पार पाडले, यावेळी बालाजी मंदिर संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री विकास चौधरी खजिनदार श्री मोहन तावडे सदस्य श्री मुन्ना परदेशी सुभाष महाजन श्री मिलिंद दुसाने श्री मनोज शिंपी श्री गबा चौधरी, श्री दिलीप चौधरी, तसेच श्री मोगरीधारक अर्जुन चौधरी विजू चौधरी अशोक सोनवणे राजेंद्र चौधरी आधार महाजन शिवराम महाजन अशोक महाजन भैय्या महाजन विठ्ठल आप्पा महाजन बापू चौधरी चेतन महाजन इत्यादींनी अर्थाला मोगरीसाठी विशेष सहकार्य केले तसेच किरण शिंपी व बालाजी रथ उत्सव मित्र मंडळ यांनी देखील रथाच्या सजावटीसाठी सहकार्य केले तसेच श्री कवी गो शि म्हसकर, यांच्याकडून मोगलीधारकांना रुमाल टोपी व बॅच बिल्ले सेवा म्हणून समर्पित करण्यात आले तसेच रथावर कवी गो शि म्हसकर, समाधान तावडे यांनी रथावर आपले सेवा देऊन सहकार्य केले, यावेळी रथोत्सवाला गावातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते श्री माजी उपसरपंच नामदेव पाटील ,अविनाश आबा कुडे, सागर पाटील, श्री पिंटू भामरे ,अभिलाषा रोकडे, तसेच गावातील महिला व पुरुष भजनी मंडळ मोठ्या संख्येने टाळ मृदंगाच्या तालावर यात्रोत्सवात सहकार्य केले यावेळी श्री मुन्ना भंडारकर यांच्याकडून ५०१०० बुंदीच्या लाडूचा प्रसाद सेवाभावी वृत्तीने बालाजी महाराजांच्या चरणी समर्पित करण्यात आला, परिसरातील व खानदेशातील विविध भागातून पाळणे तसेच इतर महत्त्वपूर्ण दुकानांनी गाव परिसर दुमदुमला तसेच, नगरदेवळा परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी केळीचा प्रसाद बालाजी मंदिर संस्थान ट्रस्टला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मंदिर संस्थान ट्रस्टच्या वतीने श्री मोहन तावडे श्री मुन्ना परदेशी यांनी सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले, , व रथ सजावट करणाऱ्या गावातील सर्व तरुणांचे संस्थांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!