जळगाव जिल्हा

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था लि.पाचोरा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

पाचोरा-

जिल्ह्यातील संस्थेपैकी एक नामांकित असलेल्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील ज्ञानगंगा म्हणून नावारूपाला आलेल्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेची २०२३-२४ते२७-२८कालावधीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली.

पीटीसी संस्थेच्या चेअरमन,मानद सचिव, संचालक मंडळ,पेट्रन व डोनर अशा ३४जांगासाठीचा निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला होता.दि.२५ते२९पर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पडली.

पीटीसी संस्थेच्या चेअरमन व मानद सचिव पदासाठी च्या प्रत्येकी एक जागेसाठी एक एक अमेदवारी अर्ज दाखल झाला होता मॅनेजिंग कमेटी सिंपथायझरच्या २५जागांसाठी २९अर्ज दाखल झाले होते.त्या पैकी अंतिम मुदतीत चार अमेदवारांनी माघार घेतली.

पेट्रनच्या सहा जागांसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले त्या पैकी एक उमेदवाराने माघार घेतली सिम्पथायजर जागेसाठी चार व पेट्रनच्या एक अशा पाच अमेदवारांनी माघार घेतली.डोनरच्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही जागा रिक्त असुन उर्वरित ३४पैकी ३३जागांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ॲ.एस.बी.माहेश्वरी यांनी जाहीर केले.

त्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय चौधरी यांनी काम पाहिले.सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचा सत्कार करण्यात आला.पीटीसी संस्थेच्या परिपुर्ण विकासासाठी संस्थेचे नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक कटीबद्ध असल्याची ग्वाही माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, चेअरमन संजय नाना वाघ, मानद सचिव अॅड महेश देशमुख,व्हा चेअरमन व्हि.टी.नाना जोशी यांनी ग्वाही दिली.निवडणूक बिनविरोध जाहीर झाल्यानंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाने बांबरुड (राणीचे) येथील डॉ राम मनोहर लोहिया विद्यालयातील प्रांगणातील संस्थेचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार कै.ओकांर आप्पा वाघ यांच्या शक्तीस्थळास अभिवादन केले.सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
बिनविरोध नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक ,अध्यक्ष माजी आमदार दिलीप भाऊ वाघ , चेअरमन संजय नाना वाघ ,मानद सचिव अॅड महेश देशमुख, व्हा चेअरमन व्ही.टी.जोशी,प्रा.सुभाष तोतला, शिवनारायण जाधव, राकेश थेपडे,जिवराज आणले, वासुदेव महाजन , जगदीश सोनार, मधुकर पाटील, ब्रिजलाल संघवी, योगेश पाटील, भागवत महालपूरे, सुरेश देवरे,खलील देशमुख,भागचंद राका, लताबाई पाटील, संजय कुमावत, डॉ.जयवंतराव पाटील, नानासाहेब देशमुख,विनय जकातदार, सुनिल पाटील, सतीष चौधरी, दत्तात्रय पवार, विजय देशपांडे, मनिषा पाटील, प्रकाश पाटील, अर्जूनदास पंजाबी, जिजाबाई पाटील, दगाजी वाघ, डॉ.पितांबर पाटील दुष्यंत रावल या संचालकांची निवड करण्यात आली.
यावेळी मोहन पाटील,मधुकर वाघ, भुषण वाघ, आकाश वाघ,सुरज वाघ,श्याम भोसले,प्रदीप वाघ, शशिकांत वाघ, शिवदास पाटील,हर्षल पाटील, राहुल पाटील, विश्वासराव साळूंखे , रणजित पाटील, शालिग्राम मालकर डी .व्ही .पाटील ,जी .एन .पाटील आदी उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!