3 डिसेंबर जागतिक अपंग दिन पासुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या शासकीय निवासस्थान समोर RCI धारक 100% अंध 150 विशेष शिक्षक कर्मचारी करणार अन्नत्याग उपोषण
नागपूर-
समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग अंतर्गत मागील 17 वर्षांपासून प्राथमिक स्तरावर अल्प मानधन तत्वावर 1775 विशेष शिक्षक कार्यरत आहेत. या 1775 विशेष शिक्षकांमध्ये 150 विशेष शिक्षक/कर्मचारी हे 100% असुन मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शासन सेवेत सामावून घेण्यासाठी त्यांनी 1775 विशेष शिक्षकांसमवेत दिनांक 2 ऑक्टोंबर 2023 राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिन पासून 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत आजाद मैदान मुंबई येथे सहकुटुंब बेमुदत आमरण उपोषण सुद्धा केले आहे. दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विशेष शिक्षक पदनिर्मिती व पदभरती विषयी बैठक पार पडली. शिक्षणमंत्री महोदयांनी सदर विषय घेण्यासाठी संबंधितांना सुचविले होते. पण दिनांक 2 नोव्हेंबर 2023 ला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडून निर्गमित झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये या 100% अंध 150 विशेष शिक्षक/कर्मचाऱ्यांसंदर्भाने कुठेही नामोल्लेख करण्यात आला नाही. एवढेच नव्हेतर मागील 6 वर्षांपासून 1 पैशाची मानधन वाढ सुध्दा आमच्या मानधनात करण्यात आली नाही. तसेच इतर कर्मचाऱ्यांना देय असलेले भत्ते सुद्धा या अंध कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येत नाही. उदा. प्रवास भाडे, मदतनीस भत्ता..
यापूर्वीही 2018 मध्ये सुद्धा 5% आरक्षणानुसार समायोजन मिळणेसंदर्भाने मुंबई येथे 100% अंध विशेष शिक्षक/कर्मचारी यांच्या कडून आंदोलन व पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात आला होता. पण अद्यापही असंवेदनशील शासन व प्रशासनाकडून या 100% अंध-अपंग विशेष शिक्षक/कर्मचाऱ्यांकडे लक्ष दिल्या गेले नसल्यामुळे आता न्याय मिळण्यासाठी थेट 3 डिसेंबर जागतिक अपंग दिन पासुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरी बंगला नागपूर येथे हे RCI धारक 100% अंध 150 विशेष शिक्षक/कर्मचारी अन्नत्याग उपोषण करणार आहे. अशी माहिती श्री. विठ्ठल शालिकराम नवघरे, सदस्य, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र यांनी दिली आहे.