जळगाव जिल्हा

मतदार संघाच्या विकास कामांसाठी ४३ कोटींचा निधी मंजुर-
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मानले राज्यसरकार चे आभार

पाचोरा-

पाचोरा भडगाव मतदार संघात रस्ते काॅक्रेटिकरण,डांबरीकरण व अत्यावश्यक ठिकाणी पुलांची कामे करण्यासाठी डिसेंबर २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात राज्यशासनाकडुन ४३ कोटीचा निधी मंजुर झाला असुन फेब्रुवारीत आचारसंहिता लागण्या अगोदर मतदार संघात ही विकास कामे सुरू होणार असल्याची माहीती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पञकार परिषद घेऊन दिली.

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या निवासस्थानी आज घेण्यात आलेल्या पञकार परीषद प्रसंगी आमदार पाटील सह जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील,बाजार समीती सभापती गणेश पाटील,माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील,उपनगराध्यक्ष शरद पाटे,बंडु चौधरी,जि.प.सदस्य पदमसिंग पाटील, सुनिल पाटील,किशोर बारवकर ,स्विय सहाय्यक राजेश पाटील आदी उपस्थीत होते.यावेळी बोलतांना आमदार पाटील म्हणाले की,पाचोरा तालूका हा दुष्काळ सदृष होता.त्यामुळे जलयुक्त शिवार,सलसंपदा व जलसंधारणासाठी २०० ते २५० कोटींची कामे मागील पाच वर्षात केल्यामुळे भुजल वाढल्याने शैतकर्‍यांना शेतीच्या पाण्याची अडचण आता येत नाही.मोठ्या प्रमाणात शेतीचा वापर रहिवासासाठी झाल्याने शेती व्यवसाय कमी झाला.माञ उर्वरीत शेती बागायत झाल्याने शेतीला पाणी देण्यासाठी विजेच्या ट्रान्स्फर ची मागणी वाढत आहे.

भविष्यातील विजेची समस्या मार्गी लावण्यासाठी मतदार संघात विजेचे जाळे निर्माण करणार आहे.सुमारे १५० किलोमिटर शेतरस्ते पाचोरा तालुक्यात मंजुर झाले असुन शेतकर्‍यांनी शेतरस्ते कामात अडचणी न आणता शेतरस्त्यांना प्राधान्य द्यावे.उद्योग व्यवसाय आणी बेरोजगारी निर्मुलन साठी तालुक्यात औद्योगिक वसाहतीचा विषय मार्गी लागला आहे.याठीकाणी पाणी,विज,रस्ते ही व्यवस्था मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.हा परिसर रेल्वेच्या मुख्य मार्गावर असल्याने भविष्यात रेल्वेचा एखादा मोठा प्रकल्प आणण्यासाठी केंद्रिय रेल्वे राज्यमंञी रावसाहेब दानवे यांची दिल्लीला जाऊन भेट घेणार आहे.मतदार संघ कापुस उत्पादक शेतकर्‍यांचा असल्याने ८५ कोटींची सुतगिरणीची मंजुरी मिळाली असुन भाग भांडवलाचा विषय मार्गी लावण्याच्या कामाला गती मिळाली आहे.२०२४ च्या आतही सुतगिरणी उभी करून येथे ७ ते८ हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे.शहरी भागात सांडपाणी व्यवस्थापन व पिण्याच्या पाण्याचा विषय मार्गी लावण्यासाठी २०१७ ते २०२३ पर्यंत काम सुरू आहे.शहराचा वाढता विस्तार पाहता भविष्यातिल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ५० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजुर केली असुन हे काम ६ ते ८ महीन्यात पुर्ण होणार आहे.शहरातिल रेल्वे लाईन पलिकडिल भागात रस्ते काॅक्रेटिकरण कामाचा बजेट १०० कोटींचा आहे.तसेच रेल्वे पुल हायवेच्या दोन्ही बाजुने सर्व सोयीयुक्त आॅक्सीजन पार्क,स्काॅयवाक निर्माण करायचे आहे.पुरातन राममंदिरात जाण्यासाठी जैनपाठ शाळेच्या बाजुने नविन मार्ग व पुलाची संकल्पना आहे.त्याचप्रमाणे,स्विमिंगटॅंक,जाॅगिंग टॅक्ट,नाट्यगृह,इंडोर खेळासाठीच्या विकास कामाची संकल्पना आहे.

शहरालगत असलेल्या धार्मिक स्थळातील काकनबर्डी परिसर विकास कामासाठी १७ कोटींचा निधी मंजुर झाला असुन तेही काम लवकरच सुरू होत आहे.१७ कोटींचे उपजिल्हारूग्णालय वर्षभरात पाहण्यास मिळेल.व्यापारी भवन व आठवडे बाजारातील व्यापारी संकुलाचे काम सुरू झाले आहे.भडगाव शहरासाठी ११० कोटींची पाणीपुरवठा योजना अंतिम टप्यात आहे. अशा मतदार संघातील शेकडो कोटींच्या विकास कामांची माहीती यावेळी दिली.मतदार संघाच्या विकास कामासाठी ४३ कोटींचा निधी मजुर करून दिल्याबद्दल आमदार किशोर पाटील यांनी राज्यशासनाचे आभार मानले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!