मुस्लिम बांधवांचा शिवसेना पक्षप्रवेश सोहळा संपन्न सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर दाखवला विश्वास
भडगाव-
भडगाव येथील मुस्लिम बांधवांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे नेतृत्व मान्य करून सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा घालून अतिशय आनंदात प्रवेश सोहळा दिनांक 12/12/2023 रोजी सायंकाळी भडगाव येथे संपन्न झाला. यावेळी पुढील मान्यवरांनी प्रवेश घेतला. शेख युसुफ कुरेशी, शहीद खान गफार खान कुरेशी, अश्फाक खान जाबीर खान कुरेशी, सुलतान खान इदरीश खान कुरेशी, शेख कामील शेख गनी कुरेशी, नासिर खान इदरीस खान कुरेशी, रसूल खान रशीद खान कुरेशी, शेख मजहर शेख बुरहान कुरेशी, आरिफ खान सुबहान खान कुरेशी, शेख अखिल शेख गनी कुरेशी, फेजल खान कयूम खान कुरेशी, यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील भडगाव, माजी नगरसेवक मनोहर चौधरी,शहर प्रमुख शंकर मारवाडी, विजय साळुंखे उपजिल्हा युवाधिकारी माधव जगताप, युवा शहराधिकारी चेतन पाटील, अमोल पाटील सह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पक्ष प्रवेश जोरात व उत्साहात संपन्न झाला.