दि पाचोरा पिपल्स को-ऑ बँकेच्या ५८वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा.
पाचोरा-
पाचोरा,भडगाव,नगरदेवळा,जामनेर व जळगाव तालुक्यामधील बॅकिंग क्षेञात ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या आणी पंचक्रोशीतील व्यापार्यांच्या आर्थिक व्यवहाराचे केंद्रबिंदु असलेल्या दि पाचोरा पिपल्स को-आॅफ बँकेचा५८ वा वर्धापन दिवस उत्साहात संपन्न झाला.
या वर्धापनाचे औचित्य साधत बँकेने येणार्या २०२४ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करुन बँकेच्या कामकाजावर विश्वास ठेवणार्या भागधारक,ग्राहक व हितचिंतकाचे चेअरमन अॅड. अतुल संघवी,व्हा.चेअरमन प्रशांत अग्रवाल सह संचालक मंडळाने आभार व्यक्त केले.
जिल्ह्यातिल बॅकिंग क्षेञात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवणार्या दि पाचोरा पिपल्स को-आॅफ बॅंक लि ची स्थापना ही १६ डिसेंबर १९६५ रोजी पाचोरा येथे झाली होती.
पाचोरा तालुका व पंचक्रोशीतिल शेतकरी,व्यापारी व छोट्या उद्योजकांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या बॅकेने पाचोरा शहरासह भडगाव,नगरदेवळा,शेंदुर्णी,जामनेर व जळगाव येथे आपले व्यवसायीक जाळे पसरवित आपल्या कार्याची यशस्वी पताका सर्वञ पसरवली.
मागील काळात बॅंकींग क्षेञात आलेल्या वादळातही आपल्या तत्वांना घट्ट पकडुन हा वटवृक्ष ५८ वर्षांचा झाला.बॅंकांच्या सर्व शाखांमध्ये दिवसभर आलेल्या ग्राहकांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.आज बॅंकेचे मुख्य शाखेत चेअरमन अॅड.अतुल संघवी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हा.चेअरमन प्रशांत अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी संचालक जीवन जैन,प्रकाश पाटील,प्रा.भागवत महालपुरे,देवेंद्र कोटेचा,शरद पाटे,विकास वाघ,माजी संचालक व्ही.टी.जोशी यांच्यासह बॅंकेचे कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी बॅंकेच्या प्रगतीचा आलेख वाचन करून देण्यासोबतच बॅंक देत असलेल्या विविध सेवा सुविधांची माहीती दिली.यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्रशांत अग्रवाल यांनी बॅंकेने आधुनिक तंञज्ञानाचा वापर करण्यासोबतच बॅंकांच्या स्पर्धेत आपण अग्रेसर कसे राहू यावर भर दिला जाणार असल्याचे सांगत येणार्या काळात जिल्ह्यातील बॅंकींग क्षेञात अग्रस्थानी बॅंकेचे नाव घेतल्या जाईल याचा विश्वास व्यक्त केला.आलेल्या मान्यवरांनी बॅंकेच्या प्रगतीवर मनोगत व्यक्त केले.
यावेळी बॅंकेची स्थापना १९६५ साली झाली असल्याने १९६५ रूपयांची मासिक रिकरिंग ठेव योजनेची घोषणा करण्यात आली ही रक्कम १२० महिने नियमित भरली तर ग्राहकास ३ लाख ६१ हजारांचा परतावा देण्यात येईल अशी माहीती दिली.यावेळी बॅंकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.