कापसाला दहा हजार रुपये हमी भाव व पिकविमा भरपाई मिळावी मनसेच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन.
पाचोरा-
कापुस पिकाला 10,000 हजार रुपये हमी भाव मिळावा व पिक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चा वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले सदरचा निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की,
भारत हा कृषी प्रधान देश असुन शेतकरी बांधवांवर सतत राज्य सरकारकडून अन्याय होतांना दिसत आहे, आम्ही आपल्याला विनंतीपूर्वक वरील विषयास अनुसरुन निवेदन देत आहोत. आमच्या मागण्या खालीलप्रमाणे आहे.
ह्या वर्षी गारपीट व झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, अशी परीस्थीती असतांना मात्र शासनाचे शेतकरी बांधवांकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होत असल्याचे निर्दशनास येत असुन मागील वर्षीप्रमाणे शासन यावेळी शेतकरी बांधवांचा अंत पहात आहे.
अवकाळी पावसामुळे पिकांची (कपाशी, तुर, मुंग, हरभरा, मिरची, टमाटे इत्यादी अशा पिंकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे असतांना मागील वर्षाप्रमाणे शेतकरी राजा हा हवालदील झालेला आहे. विरोधामध्ये असतांना जिल्ह्यातील मंत्री हे शेतक-यांच्या कपाशीला भाव मिळावा म्हणुन कित्येक दिवस उपोषणाला बसले होते. परंतु आज सत्ता असतांना शेतक-यांना न्याय देवु शकत नाही हि मात्र शोकांतीका आहे म्हणुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा मंत्र्याचा व सरकारचा जाहीर निषेध करीत असुन कपाशीला दहा हजार रुपये भाव मिळावा व पिक विम्याचे पैसे कुठलीही आडकाठी न आणता शेतक-यांना तात्काळ द्यावे अशी या निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी करीत असुन येणा-या आठ दिवसात या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शासनाचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी रस्ता रोको आंदोलन हे व पिक विमा कंपन्याच्या कार्यालयाला जावुन टाळे लावण्यात येतील याची नोंद शासनाने घ्यावी, होणा-या परीणामास शासन व प्रशासन जबाबदार राहील.
या आशयाचे निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळी,यश रोकडे उपशहराध्यक्ष, प्रशांत पाटील उपजिलाध्यक्ष ,रोहीत पवार, ज्ञानेश्वर ठाकरे, श्रीकृष्ण दंदुले,निलेश मराठे,वाल्मीक जगताप,अक्षय पाटील उपस्थित होते.