जळगाव जिल्हा

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शुक्रवारी शोकसभेचे आयोजन..


पाचोरा-

पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे नुकतेच 24 फेब्रुवारीला वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ येत्या शुक्रवारी 7 फेब्रुवारी 2025 रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई धनसिंग पाटील गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यामुळे मागील काही दिवसांपासून प्रकृती अवस्थेमुळे उपचार सुरू होते. दरम्यान, 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास त्यांनी घेतला. 24 फेब्रुवारी रोजी पाचोऱ्यातील चिंतामणी कॉलनी भडगाव रोड येथून दुपारी 3 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस सुरूवात झाली. त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यानंतर सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर किशोर आप्पा पाटील यांनी त्यांच्या मातोश्री नर्मदाबाई पाटील यांना अग्निडाग दिला.आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त सर्वत्र समजताच, नातेवाईकांसह विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार पाटील यांच्या मातोश्रींचे अंतिम दर्शन घेतले. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्रींच्या अंत्यसंस्कारावेळी पाचोरा शहरासह पंचक्रोशीतील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई धनसिंग पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शुक्रवार 7 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील चिंतामणी कॉलनीतील शिवतीर्थ याठिकाणी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच शुक्रवारी 7 मार्च 2025 रोजी सायंकाळी 8 वाजता ह. भ. प. समाधान महाराज भोजेकर आणि शनिवारी 8 मार्च 2025 रोजी सकाळी 8 वाजता ह. भ. प. गोविंद महाराज वरसाडेकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या किर्तनानंतर सकाळी 10.30 वाजता उत्तरकार्याचा कार्यक्रम होईल.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!