जळगाव जिल्हा

कमलेश सोनवणे जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित…

पाचोरा-

तरुण वयात सेवाभावी वृत्तीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वोत्कृष्ट कार्याचा गौरव व प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र दिनी जिल्हा स्तरावर युवा पुरस्कार दिला जातो.
यंदाचा जळगाव जिल्ह्याचा युवा पुरस्कार (युवक) पाचोरा शहरातील युवा समाजसेवक कमलेश सोनवणे ह्यास पोलिस परेड मैदान, जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ह्यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिश्मा नायर, पोलिस अधीक्षक  श्रीकांत धिवरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण, आरोग्य, लिंग समानता, क्रीडा, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत कार्य करणारा युवा चेहरा व व्याख्याता म्हणून कमलेशची ओळख असून याआधीही त्याने नवी दिल्लीतील विज्ञान भवन व भारत मंडपम येथे आपल्या व्याख्यानाने जळगाव जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. तो सध्या स्वतःची सामाजिक संस्था चालवत असून केंद्रीय युवा मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत’चा सक्रिय स्वयंसेवक म्हणूनही कार्यरत आहे. ह्या पुरस्कारामुळे प्रोत्साहन मिळाले असून यापुढे अधिक जोमाने कार्य करत आपल्या अनुभव व कौशल्याने येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तरुणाईसाठी मोठं काम उभं करणार असल्याची भावना बोलून दाखवली.
त्याच्या ह्या यशाबद्दल जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, के.सी.ई. शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष  नंदकुमार बेंडाळे व परिसरातील सर्वांनीच कमलेशचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सामाजिक क्षेत्रात सोबत काम करण्यास इच्छुकांना संपर्कासाठी कमलेश सोनवणे ह्यांनी आवाहन केले आहे. कमलेशशी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जुडण्यासाठी ९९६०८४२३६९ ह्या नंबरवर संपर्क करावा तसेच इन्स्टाग्रामवर @kamlesh4india वर कनेक्ट व्हावे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!