जळगाव जिल्हा

पाचोरा विधानसभा मतदार संघातआठवडे बाजारात मतदार सुविधा कक्षाची स्थापना, उपक्रमास उत्कृष्ट प्रतिसाद


पाचोरा-

जळगाव लोकसभा 2024 मतदारसंघ अंतर्गत पाचोरा विधानसभा मतदारसंघात पाचोरा येथे २७ एप्रिलरोजी भरलेल्या आठवडे बाजारात  ‘मतदार सुविधा कक्ष’ स्थापन करून सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सेक्टर ऑफिसर व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) त्या ठिकाणी उपस्थित होते. या उपक्रमास मतदारांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला या वेळी मतदारांचे मतदार यादीतील अनुक्रमांक शोधून देण्यात आले तसेच मतदानकेंद्राचे ठिकाण व मतदानाची वेळ या बाबत मतदाराना माहिती देण्यात आली.पाचोरा येथील ‘मतदार सुविधा कक्ष’ येथे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल ऑफिसर सुभाष कुंभार नायब तहसीलदार सुभाष कुंभार, मुख्याधिकारी मंगेश देवरे , दुर्गेश सोनवणे,BLO रमेश लक्ष्मण भोसले, शामकांत अहिरे, भिकन गायकवाड,विशाल मराठे,प्रकाश गोसावी, सुभाष बागुल, युवराज जगताप,आकाश खैरनार   उपस्थित होते.
पाचोरा विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये जनजागृती व्हावी व मतदान करणे कामी मतदाराना आवश्यक ती माहिती द्यावी यासाठी सदर उपक्रम राबविण्यात आला.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!