जळगाव जिल्हा

अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून पाचोऱ्यात विविध रूपांत होतेय बाप्पाचे दर्शन.

पाचोरा-

येथील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री गणेशाचे विविध रूपांत दर्शन हे नागरिकांना आशीर्वाद हॉल भडगाव रोड पाचोरा येथे होत.दरवर्षी अनोख्या पद्धतीने स्थानिक व बाहेरील नामांकित कलाकारांच्या कल्पकतेतून श्री गणेशाची विविध रूपातील कलाकृतीजी मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरात बघावयास मिळतात त्या कलाकृती पाचोरा व भडगाव तालुक्यासह परिसरातील नागरिकांना बघावयाची संधी अमोल शिंदे यांचे संकल्पनेतून मिळत असते. आणि नागरिक देखील या कलाकारांनी साकारलेली कलाकृती बघण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात. या वर्षीच्या विशेष आकर्षणामध्ये श्री गणेशाच्या खालील तीन प्रकारच्या कलाकृती यावेळी साकारण्यात आलेले आहेत.

१) ९२०० चहाच्या कागदी कपांपासून साकारलेल्या श्रीगणेशा

दैनंदिन जीवनात सभोवताली दिसणारे व वापरांत येणाऱ्या विविध वस्तूंपैकी त्यातील एक म्हणजे चहा पिण्यासाठी वापरात येणारा चहाचा कागदी कप या ९२०० कपांपासून यावेळी साकारण्यात आलेल्या श्री गणेशाच्या कलाकृती मधून नागरिकांना बाप्पाचे दर्शन होत आहे.

२) १२४०० घंट्यांपासून हँगिंग करून साकारलेला श्रीगणेशा

शोभेच्या वस्तूंमध्ये नेहमी वापरात येणाऱ्या घंट्यांपासून हँगिंग करून साकारण्यात आलेला श्री गणेशा नागरिकांची विशेष आकर्षण ठरत आहे. कलाकारांच्या कल्पकतेतून साकारण्यात आलेल्या या बाप्पाचे रूप बघण्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे.

३) १८९०० कागदी फुलांपासून साकारण्यात आलेला श्री गणेशा

पर्यावरण पूरक अशा पद्धतीने साकारण्यात आलेल्या अशा सर्व कलाकृतींमध्ये १८९०० कागदी फुलांपासून साकारण्यात आलेल्या कलाकृतीसाठी मोठ्या संख्येने सह- कलाकारांच्या मेहनतीने साकारण्यात आलेली तिसरी गणेशाची देखणी कलाकृती आपल्या मोबाईलच्या कॅमेरातन स्पष्ट व सुंदर बघावयास मिळत आहे.
वरील श्री गणेशाच्या सर्व कलाकृती साकारण्यासाठी प्रमुख कलाकारांमध्ये मुंबई येथील सुप्रसिद्ध आर्टिस्ट चेतन राऊत, निशांत गावित, पाचोरा येथील गणपती क्रिएशनचे संचालक राहुल पाटील सर, पाचोरा येथील यश साळुंखे, संकेत पाटील यांच्यासह इतर सह-कलाकारांनी विशेष मेहनत घेतली आहे.
याप्रसंगी मूळ संकल्पना असलेले भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यासह परिसरातील सर्व नागरिकांना श्रीगणेशाच्या या कलाकृतींचे दर्शन घेण्यासाठी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी दिपक माने, शहराध्यक्ष भाजपा  शहर सरचिटणीस समाधान मुळे, जगदीश पाटील,अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष  टिपू देशमुख,  संदीप पाटील,विरेंद्र चौधरी,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल गायकवाड,युवा मोर्चा शहराध्यक्ष  योगेश ठाकूर,रोहन मिश्रा, राहुल महाजन,विशाल मोरे, योगेश लोणारी,यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!