कोपरगांव-
दिनांक 25/04/2023 रोजी रात्री 8:30 वाजे दरम्यान पुणतांबा फाटा ते झगडे फाटा जाणारे रोडवर झगडे फाटा ता. कोपरगाव येथे डॉ. तुषार बाळासाहेब खंडीझोड वय 24 वर्ष रा. सोनेवाडी ता. कोपरगांव हे त्यांचे मोटार सायकलवर हायवेने घरी जात असताना चांदेकसारे शिवारात पल्सर मोटार सायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी फिर्यादीची मोटार सायकल अडवुन त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे जवळील मोबाईल, रोख रक्कम डेबीट कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स असा एकुण 20,900 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं.324/2023 भा.द.वि.क. 392,341,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोबाईल हॅण्डसेटचे तांत्रीक विश्लेषण करुन, गोपनीय बातमी दाराचा मार्फतीने गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी नामे राजेंद्र काकळोज वय 25 वर्ष रा मालेगाव कॅम्प ता. मालेगाव जि. नाशिक याचा सक्रीय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोलीस पथकाने मालेगाव जि. नाशिक येथुन ताब्यात घेतले व सदर गुन्ह्यात अटक करुन त्यास मुदतीत मा. न्यायालयासमोर हजर करुन त्याची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली, पोलीस कोठडी रिमांडमध्ये आरोपीने पोलीसांकडे गुन्ह्याची कबुली दिली असुन, नमुद गुन्ह्यात चोरुन नेलेल्या 20900 रुपयांच्या मुद्देमालापैकी 20,000 रुपये किंमतीचा मोबाईल हॅण्डसेट त्याने काढुन दिल्याने तो हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हा करतेवेळी त्याचे सोबत असलेल्या आरोपीचे नांव त्याने सांगीतले असुन, सदर आरोपी हा सध्या इतर पोलीस स्टेशनकडील गुन्ह्यांमध्ये अटक असल्याची माहीती प्राप्त झालेली आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध हा पोलीसांनी फिर्यादीचे चोरीस गेलेल्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेशनाचे आधारे व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने अत्यंत कुशलतेने करुन जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कौतुकास्पद कामगिरी मा.श्री राकेश ओला सो.पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, मा.श्री संदीप मिटके सो उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, सहाय्यक फौजदार सुरेश गागरे, पोकों, रशिद शेख, पो.कॉ.
अनिस शेख पो.कॉ. रोहित आरवडे, पो.कॉ अमोल फटांगरे, चालक पो.ना. साळुंके, पो.कॉ. मेढे व पो.कॉ. आकाश बहिरट, सायबर सेल श्रीरामपूर यांचे पथकाने केली आहे.