कोपरगांव
कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन गु र नं ५९४/२०२३ भा.द.वी. कलम ३६५,३२७, ३४६,३४७, ३४८,५०६, ३४ सह महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधि २०१४ चे कलम ३९,४५,४६ मधील फिर्यादी नामे शुक्लेश्वर उत्तम भुजाडे वय ५० वर्षे रा आप्पेगाव ता कोपरगांव यांनी कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक २७/१२/२०२३ रोजी फिर्याद दिली होती कि, दिनांक ०९/१२/२०२३ रोजी सकाळी १०:०० ते दिनांक ११/१२/२०२३ रोजी रात्री ०९:३० वाजे चे दरम्यान शिरसगाव व कोपरगांव हददीतील शिवारात आरोपी नामे १] शरद आनंदराव गायकवाड, २] त्यांचा भाऊ दत्तु आनंदराव गायकवाड, ३] सुनिल भुजबळ, ४] नारायण जाधव व ५] खंडू शरद गायकवाड व तिन अनोळखी ईसम यांनी मी व्याजाने घेतलेली रक्कम परत करुन देखील अजुन पैशाची मागणी करत पैसे न दिल्यास त्यांचे नावावरील जमीन बळजबरीने यातील आरोपीचे नावावर करण्यासाठी संगणमत करुन फिर्यादीस त्यांचे निळे रंगाची इरटीका गाडीत किडनॅप करुन मारहाण करुन यातील प्रमुख आरोपी नामे हर्षल दत्तात्रय गवारे यांचे सांगणे वरुन डांबुन ठेवले वगैरेचे फिर्यादी वरुन गुन्हा रजिस्टरी दाखल झाला होता. सदर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेवुन तात्काळ सदर गुन्ह्यातील आरोपी १] शरद आनंदराव गायकवाड वय ५० वर्षे २] प्रतिक उर्फ खंडु शरद गायकवाड वय १९ वर्षे रा शिरसगाव ता कोपरगाव यांना दि २८/१२/२०२३ रोजी २२:४८ वा. अटक करण्यात आली असुन त्यांनी सदर गुन्ह्यांची कबुली दिल्याने व सदर गुन्ह्यांतील अनोळखी दोन आरोपी शैलेश राजेद वाघ व चेतन प्रभाकर मोरे यांची नावे सांगुन सदर गुन्ह्यांत वापरलेली इरटिगा गाडी हि चेतन प्रभाकर मोरे याची असले बाबत सांगीतल्याने सदर आरोपी याचा शोध घेवुन सदर आरोपी नामे चेतन प्रभाकर मोरे हा पळुन जाण्याचे तयारीत असतांना त्याचे ताब्यातील इरटिगा गाडी नं एम एच ०६ बी ई ६८९५ सह त्यास अटक करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्ह्यांत वापरण्यात आलेल्या मोटरसायकल नं एम एच १७ ऐ एल ६८२८ व एम एच १७ ऐ २४२९ या दोन मोटर सायकल देखील जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच गुन्ह्यांत सावकारी संदर्भातील पुरावे देखील हस्तगत करण्यात आलेले आहेत. तरी सदर गुन्ह्यांतील ईतर पाहिजे आरोपी १] हर्षल दत्तात्रय गवारे २] दत्तु आनंदराव गायकवाड, ३] सुनिल भुजबळ, ४] नारायण जाधव व ईतर एक आरोपी यांचा शोध घेवुन त्यांना अटक करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
एकुण जप्त मुददेमाल १]
१०,००,०००/- र कि ची इरटिगा गाडी नं एम एच ०६ बी ई ६८९५ ५०,०००/- र कि ची मोटरसायकल नं. एम एच १७ ऐ एल ६८२८ २]
३] ५०,०००/- र कि ची मोटरसायकल नं एम एच १७ ऐ २४२९
११,००,०००/- रुपये एकुण
सदरची कामगरी हि पोलीस अधिक्षक अहमदनगर, स्वाती भोर मॅडम मा अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर, मा संदिप मिटके सो उप विभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले सो, पोहेकॉ.लांडे, पो.कॉ.वाघ, पोकॉ.कोतकर, पोकॉ.घनवट, पोकॉ/राजु शेख, पो.कॉ.सानप, पो.कॉ.आरवडे यांचे पथकाने केलेली आहे.