मुलाच्या सासरच्या मंडळींनी अपमानीत केल्याच्या कारणावरून जिवार्डी येथील वृध्दाने संपवली जिवन यात्रा!खिशात सापडली चिठ्ठी
भडगाव-
नातवांच्या प्रेमापोटी व मुलाच्या विस्कटलेल्या संसाराची घडी पुन्हा बसविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बापास मुलाच्या सासरच्या मंडळींनी अपमानित केल्याने या त्रासाला कंटाळून जुवार्डी येथील भीमराव पाटील यांनी विषारी औषध प्राशन करत आपली जीवन यात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जुवार्डी येथील सुनिल पाटील यांनी फोनद्वारे मुंबई येथील पोलीस दलात उपनिरीक्षक पदी कार्यरत असलेले योगेश पाटील यांना कळविले कि, तुमचे वडिल नामे भिमराव पाटील यांनी तुमच्या घराचा छतावर काहितरी विषारी पदार्थ सेवन केल्याने बेशुध्द अवस्थेत पडलेले आहेत, तेव्हा पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील लागलीच मुंबई येथुन रेल्वेने निघुन जुवार्डी येथे पोहचले, सदरच्या काळात दोन्ही भावांना त्यांनी याबाबत माहिती दिल्याने दोघेही भाऊ जुवार्डी येथे पोहचले होते. तेव्हा त्यांनी घटनेबाबत भडगाव पोलिसांना माहिती दिल्याने भडगाव पोलीस जुवार्डी येथील घटनास्थळी दाखल झाले, त्या वेळेस मयत भीमराव पाटील यांचे खिशात त्यांच्या हस्ताक्षरात वहिच्या पानावर लिहिलेल्या दोन चिठ्या पोलीसांसमक्ष मिळुन आल्या, त्यामध्ये मयत भिमराव पाटील यांनी नमुद केले आहे कि, मी गोटु पाटील, संगिता पाटील यांना भेटलो व माझ्या मुलाचा संसार मोडु नका अशा विनवण्या केल्या परंतु त्यांनी मला धक्के मारुन बाहेर काढुन दिले असे, असे नमुद केले आहे, त्यामुळेच भिमराव पाटील हे अपमानित झाल्याने त्यांनी असा टोकाचा निर्णय घेतला असल्याची फिर्याद भीमराव पाटील यांचा मुलगा मुंबई पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील यांनी भडगाव पोलिसात दिनांक 3 जानेवारी रोजी दिलेली असून फिर्यादीत म्हटले आहे की माझे सासरेचे पत्नीसह इतर 4 मंडळी नामे पत्नी छाया योगेश पाटील, सासरे गोटू पाटील, सासू संगीता पाटील शालक किरणकुमार पाटील, शालक शशिकांत पाटील हे असून यांनी नियमित अपमाणीत केल्याने यांचे त्रासाला कंटाळुन माझे वडिल भिमराव पाटील यांनी फोस्किल मोनोक्रोटोफॉस नावाचे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली त्यांचे मरणास वरिल लोकांनी प्रवृत्त केल्याने माझी वरिल 1 ते 5 जणाविरुध्द फिर्याद आहे. त्यांचे फिर्यादीवरून भडगाव पोलीसात संशयित सासरच्या पाचही जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून यातील संशयित एक आरोपी अटकेत तर 4 फरार असल्याची माहिती आज दिनांक 4 जानेवारी गुरुवार रोजी हाती आली असून या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस उपनिरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.