मोटरसायकलीत कुत्रा आडवा घुसल्याने अपघात घाटनांद्रा येथील तरुण जखमी; पाचोरा नगरपरिषद मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करेल का?
पाचोरा –
पाचोरा शहरात घाटनांद्रा येथून फर्निचर चे साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाचा मोटरसायकल मध्ये कुत्रा घुसल्याने मोटरसायकचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,घाटनांद्रा येथील रहिवासी विशाल जानकीराम खैरे वय (३६) हा तरुण घाटनांद्रा येथुन पाचोरा येथे फर्निचर चे साहित्य घेण्याकरीता आपल्या मोटरसायकल ने येत असतांना महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट जवळील रस्त्यावर 2 वाजेच्या सुमारास मोटरसायकलीत कुत्रा आडवा आल्याने अपघात झाला या अपघातात सुदैवाने तरुणाचा जीव वाचला,परंतु हाताला,पायाला,गालावर जखमा होवून दुखापत झाली, स्थानिक नागरिकांनी १०८ क्रमांकावर कॉल करत रुग्णवाहिका बोलवली, रुग्णवाहिका चालक मनोज पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात त्या तरुणास दाखल केले व डॉक्टरांनी उपचार केला.
पाचोरा शहरात दिवसेंदिवस मोकाट पिसाळलेले कुत्रे ठिक- ठिकाणी कॉलणीत, मुख्य रस्त्यावर फिरतांना दिसतात.गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील एका बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवत लचके तोडले होते. तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमागे हे मोकाट कुत्रे मागे धावतात,आज हा तरुणांचा मोटरसायकलीत कुत्रा घुसल्याने अपघात झाला सुदैवाने त्यांचा जीव वाचला.
पाचोरा नगरपरीषदेने बघण्याची भुमिका न घेता शहरात मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सुज्ञ नागरीक करत आहेत.