कुमारी खुशी अतुल संघवी CA परिक्षेत उत्तीर्ण;पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश.
पाचोरा –
दि पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन अतुलभाऊ संघवी यांची कन्या कुमारी खुशी अतुल संघवी हिने ICAI तर्फे घेण्यात आलेल्या CA फाइनल परिक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होऊन तिच्या कुटुंबाचे, शहराचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तिने तीनही पेपरमध्ये प्रथम श्रेणी मिळवून एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.
खुशीने 2021 मध्ये मुंबईतील प्रतिष्ठित N M College येथून बारावीमध्ये पहिल्या दहामध्ये उत्तीर्ण होऊन सुरुवात केली. त्यानंतर तिने मुंबईतील ICAI चेंबर्स ऑफ कॉमर्समधून CA इंटर सुध्दा प्रथम प्रयत्नात पूर्ण केले. 2022 मध्ये तिने CA फाइनल परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होऊन इतिहास रचला.
तिने तीनही पेपरमध्ये प्रथम श्रेणी मिळवली आहे.
खुशीच्या या यशाबद्दल तिच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि परिचितांनी अभिनंदन केले आहे. तिच्या वडिलांनी तिला शुभेच्छा देत तिला पुढील वाटचालीत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
खुशीने आपल्या यशाबद्दल सांगितले की, “मला लहानपणापासूनच लेखापाल व्हायचे होते. मी माझ्या मेहनती आणि परिश्रमातून हे यश मिळवले आहे. मी माझ्या घरातील वडीलधारी मंडळी व वडिलांच्या मार्गदर्शनाखाली माझे ध्येय साध्य केले आहे.“
खुशीने पुढे सांगितले की, “मी माझ्या यशाचे श्रेय माझ्या घरातील वडीलधारी मंडळी माझ्या पालकांना, माझ्या शिक्षकांना आणि माझ्या मित्र परिवारास देते. मी माझ्या यशामुळे इतर तरुणांना प्रेरित करू इच्छिते की, जर त्यांनी मेहनत आणि परिश्रम केले तर ते कोणतेही यश मिळवू शकतात.”
खुशीच्या या यशाबद्दल शुभेच्छा! तिच्या यशामुळे इतर तरुणांना प्रेरणा मिळेल, यात शंका नाही. कु.खुशी हिस या यशाबद्दल साप्ताहिक झुंज & ध्येय न्युज संचालक संदिप महाजन परिवार तर्फे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात