जळगाव जिल्हा

समता सैनिक दल हेच खरे आंबेडकरी मिशन-किशोर डोंगरे

पाचोरा-

समता सैनिक दल(संस्थापक अध्यक्ष विश्वभुषण डॅा.बाबासाहेब आंबेडकर) या दलातर्फ पाचोरा येथे हुतात्मा स्मारक छ.शिवाजी महाराज चौक येथे 7 जानेवारी रोजी सांयकाळी 5 वा. तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ताचा समता सैनिक दल हे खरे आंबेडकरी मिशन या विषयावर चर्चा व परिसंवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक आयु.किशोर डोंगरे हे उपस्थित असुन सैनिकांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की,
बाबासाहेबांच्या काळात समता सैनिक दलाला प्रमुख स्थान होते.त्यावर विस्तृत साहित्य प्रकाशित होत आहेत. रिप.चळवळीचे तीन स्तंभ रिपब्लिकन पार्टी(सामाजिक), समता सैनिक दल व बौद्ध महासभा आहेत. या तीनही संघटना मिळून ‘रिपब्लिकन परिवार’ बनतो. हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचा परिवार आहे, अशीच समाजात मान्यता होती. कालांतराने ही एकजातीय चळवळ असल्याचा खोटा प्रचार झाला.यामुळे रिप. चळवळ बदनाम झाली. उद्ध्वस्त झाली.
हा सर्व खोटा प्रचार हाणून पाडून रिप. चळवळीचे महत्त्व समाजाला जोरकसपणे समजावून सांगण्यासाठी समता सैनिक दल पुढे येत आहे.
वर्तमानातील सार्वजनिक जीवनात ‘साम-दाम-दंड-भेद’ या कपटनीतीवर समाजव्यवस्था बदलण्याचा
प्रयत्न होत आहे. यासाठी बेहिशोबी काळा पैसा वापरण्यात येत आहे. अशावेळेस समता सैनिक दलचे सिद्धांत व घटनात्मक कार्यक्रम समाजाला समजावून सांगणे हे आमचे कर्तव्य आहे. समताबसैनिक दलाचे तत्त्वे भारतीय राज्यघटनेतून विशेषतः प्रास्ताविकेतून घेण्यात आले आहेत. ‘स्वातंत्र्य,
समता व बंधुभाव’ हीच आमची जीवनमूल्ये आहेत. याच नीतीमत्तेने प्रतिगाम्यांचा पाडाव करू शकतो. ‘स्वातंत्र्य, समता व बंधुता’ हीच स.सै. दलाचा भक्कम आधार आहेत. ही तत्त्वे धोक्यात आल्यामुळेच रिप, चळवळ मागे पडली. चळवळीचा आग्रह आहे की जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आम्हाला स्वातंत्र्य, समता व बंधुभाव हवा आहे. सशक्त समाजवव्यस्था यावरच आधारलेली असावी. असे झाले नाही तर समाजात भेदभाव वाढेल व अराजकता माजेल. आणि याला शासन, प्रशासन, न्यायालय, निवडणूक आयोग, वृत्तपत्रे व इतर समाजमाध्यमे जबाबदार असतील. या सर्व राज्यघटनेने निर्माण केलेल्या संस्था आहेत. स्वातंत्र्य, समता व बंधुता याच आधारावर या संस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत. या सर्व संस्था स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची पेरणी करण्यापासून मुक्त राहू शकत नाही. अन्यथा जातीय सलोखा तसेच लोकशाहीसुद्धा उद्ध्वस्त होईल.
समता सैनिक दल, स्वातंत्र्य, समता व बंधुता वाढीस लागण्यासाठीच निर्माण करण्यात आली आहे. याला पाहुन शतकाचा इतिहास आहे. हे दल डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनीच सरू केली आहे. त्यापासून आम्ही भटकणार नाही. समता सैनिक दल हा कार्यक्रम कोणत्याही भेदभावाला विशेषतः जातीभेदाला मान्यता देत नाही. वर्णव्यवस्थेतील भेद नाकारते.विरोधी मताचा आदर करते. सर्व भारतीयांना समान न्याय मिळावा असा आग्रह धरते. भूक आणि भयापासून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच रोजगाराची संधी मिळावी म्हणून कार्यक्रम राबवते. कोणत्याही प्रकारच्या अन्यायाचा विरोध करते. या समता सैनिक दल यांचे सभासद बना ! असे उपस्थितांना आव्हान करण्यात आले.
सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थित उपजिल्हा प्रचारक पिटू सावळे, आरुण खरे व पाचोरा तालुका प्रचारक शांताराम सपकाळे हे होते. कार्यक्रमाचे आयोजक आंनद सुरवाडे, दशरथ तांबे,राहुल गायकवाड,राहुल साठे,विश्वनाथ आहिरे,देवानंद साबळे,आरुण गायकवाड, अनिल तांबे, यांनी केले आसुन नविन गणवेशधारी सैनिक व समता सैनिक दलात प्रवेश करण खरे (लोहार)दीपक वाघ(मोहाडी)सचिन बाविस्कर (मोहाडी)किरण शिरसाट (मोहाडी) सागर अहिरे (सारोळा) दिलीप सोनवणे ( नांद्रा ) जगदीश शिरसाट ( मोहाडी)योगेश म्हसणे ( नांद्रा) दिलीप सोनवणे (नांद्रा) भीमराव सोनवणे (चिंचपूर) भूषण अहिरे (सारोळा) निलेश साठे ( खडक देवळा) सागर अहिरे ( सारोळा) किरण शिरसाट (मोहाडी) जगदीश शिरसाट (मोहाडी) सुनील पवार (भातखंडे बुद्रुक) सचिन बाविस्कर भातखंडे बुद्रुक राहुल सोनवणे ( भातखंडे)राहुल सर(भातखंडे) या युवकांनी प्रवेश केला.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!