पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समिती च्या वतीने डि.आर.एम. यांना निवेदन..

पाचोरा(संपादक कुंदन बेलदार)
दिनांक-11 सप्टेंबर 2023 सोमवार रोजी पाचोरा रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी आलेल्या डि.आर.एम.सो.भुसावळ इती पांडे यांना पाचोरा रेल्वे प्रवाशी कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की,
कोरोना महामारीच्या काळानंतर सुरु झालेल्या रेल्वेच्या यातायातीचे वेळापत्रक फार मोठ्या प्रमाणात बदलले आहे. त्यांच्या परिणामी पाचोरा रेल्वे स्टेशनचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सायंकाळी 6 वाजेनंतर पाचो-याहुन मुंबईस जाण्यासाठी कोणतीही रेल्वे उपलब्ध नाही. त्यासाठी विदर्भ एक्सप्रेस (गाडी क्र. 12105 व 12106) तसेच पंजाब मेल (गाडी क्र. 12137 व 12138 ) या दोन गाड्यांना पाचोरा येथे थांबा मिळावा अशी आम्ही मागणी करित आहोत.
तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या दृष्टीने अतिषय सोयीची असलेली “भुसावळ-मुंबई पॅसेंजर” जी
आर्थिकदृष्ट्या गोरगरीब व सामान्यांना परवडणारी पॅसेंजर त्वरीत सुरु करावी व लोक भावनांचा आदर करावा.
त्याच प्रमाणे देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असलेल्या कोटा (राजस्थान) व पुणे (महाराष्ट्र) या ठिकाणी शिक्षणाच्या दृष्टीने तसेच आय टी व हब म्हटले जाणारे बेंगलुरु या ठिकाणी पाचोरा परिसरातील अनेक तरुण नोकरी व्यवसायासाठी जातात. त्यामुळे राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांना जोडणा-या खाली नमूद केलेल्या गाड्या पैकी दोन गाडींना पाचोरा येथे थांबा मिळावा.
•गाडी नं. 12627 कर्नाटक एक्सप्रेस. • गाडी नं. 09740 साईनगर-जयपुर (व्हाया कोटा) एक्सप्रेस.
• गाडी नं. 16501 अहमदाबाद बेंगलोर एक्सप्रेस गाडी नं. 16734 ओखा- रामेश्वर एक्सप्रेस
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन जनतेला दिलासा द्यावा या आशयाचे निवेदन पाचोरा रेल्वे प्रवाशी कृती समितीच्या वतीने देण्यात आले.
निवेदन देते वेळी समीतीचे अध्यक्ष खलील दादा देशमुख, कार्याध्यक्ष अँड अविनाश भालेराव,संयोजक व्हि.टी.जोशी सरचिटणीस सुनिल शिंदे, उपाध्यक्ष,भरत खंडेलवाल, अविनाश साळवे, नंदू सोनार खजिनदार पप्पु राजपुत, प्रसिद्धी प्रमुख अनिल आबा येवले,शेहबाज बागवान, यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.