कॉलेज मधुन अल्पवयीन मुलीस पळविले; भडगाव पोलीसात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल.
भडगाव-
भडगाव तालुक्यातील कोळगांव येथील कॉलेजमध्ये कागदपत्रे घेण्यास गेलेल्या परिसरामधील गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस कोळगांव कॉलेज आवारातून अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी भडगाव पोलिसांत तक्रार दिली त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, दिनांक ०८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास कोळगांव तालुका भडगांव कॉलेज येथुन माझी मुलगी वय १७ वर्ष २३ दिवस हिस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कोळगांव ता. भडगाव येथील कॉलेज आवारातुन पळवुन नेले आहे म्हणुन माझी अज्ञात इसमाविरुध्द तक्रार आहे. अल्पवयीन मुलीचा नातेवाईक मैत्रिणी कडे सर्वत्र शोध घेतला असता ती अद्याप मिळून न आल्याने वडिलांच्या फिर्यादीवरून वरून भडगाव पोलिसांत आज्ञाता विरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे करीत आहेत.