सौ. वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या (उ.बा.ठा.) यांनी व्यक्त केला जाहीर निषेध.
पाचोरा –
निष्ठावंत शिवसैनिकांना 10/01/2024 रोजी येणाऱ्या निकालाची उत्सुकता नव्हती कारण निकाल कोण देणार आहे ते न्यायाधीश नव्हे तर काही नेत्यांच्या हातातली कठपुतली आहे हे सर्वांना माहीत होतं, नार्वेकर यांनी लोकशाहीच्या खून कसा केला हे संपूर्ण जगाने बघितलं. आज दिनांक 11/01/2024 रोजी सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात मतदार संघाच्या तमाम शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी जेष्ठ शिवसैनिक कार्यकर्ते व नागरिकांनी ह्या निर्णयाच्या विरुद्ध निषेध दर्शविला.
गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा विषय सुप्रीम कोर्ट आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे चालू होता. या सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षाला या आमदार अपात्र प्रकरणात निकाल देण्याचे निर्देश दिले होते आणि ते निर्देश म्हणजे संविधानाच्या तरतुदीनुसार देण्यात यावे असे संबोधले होते. परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाणीवपूर्वक हेतू पुरस्कर आमदार अपात्र प्रकरणात एकाही आमदाराला अपात्र न करता सर्वांना पात्र करून शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेचा असल्याचे त्यांनी निकालात नमूद केले. वास्तविक पाहता पक्ष कुणाचा आहे, कोणी निर्माण केला, त्याची घटना काय सांगते, त्याची घटना कोणी तयार केली हे संपूर्ण देशाला माहीत असताना, विधानसभा अध्यक्षालाही माहित असताना सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देऊन एक प्रकारे लोकशाहीची प्रतारणा करून एक प्रकारे हत्या केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या घटनेचा विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचा व त्याच्या कृतीचा आम्ही पक्षांच्या वतीने जाहीर निषेध करतो.याप्रसंगी उद्धव मराठे उपजिल्हाप्रमुख, रमेश जी बाफना शेतकरी नेते, ज्येष्ठ शिवसैनिक एडवोकेट अभय पाटील, अनिल सावंत शहरप्रमुख पाचोरा, एडवोकेट दीपक पाटील शहरप्रमुख पाचोरा, ज्येष्ठ शिवसैनिक भरत खंडेलवाल, दादाभाऊ चौधरी, पप्पू राजपूत, संजय जडे, खंडू चौधरी, संदीप जैन उपजिल्हा युवाअधिकारी, भूपेश सोमवंशी तालुका युवाअधिकारी, हरीश देवरे व मनोज चौधरी शहर युवाअधिकारी पाचोरा, अधिकार पाटील, अनिल परदेशी, भाऊसाहेब पाटील, चंदू पाटील, आशिष चौधरी, कैलास मिस्त्री, ज्ञानेश्वर चौधरी, गफार भाई, पप्पू जाधव, चंद्रकांत पाटील, अजय पाटील, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल, संजय सावंत, प्रवीण शिंपी, निखिल सोनवणे, अतुल चौधरी, ओम बोरसे, प्रवीण वाघ, अनिल शेख सह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.