जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांच्या मालाला शासकीय हमीभावाने खरेदी करा-वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या.

पाचोरा-

ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दांडीने बळीराजांचे उत्पन्न कमालीचे घटले. थोडेफार आलेले उत्पन्न बाजारपेठेत कवळीमोल भावाने मागतात.कर्जाच्या ओझ्याखाली बसलेल्या शेतकऱ्यांनी संसाराचा गाळा कसा चालवायचा.हा यक्ष प्रश्न सतत भेडसावत राहतो. कापूस हे पांढरं सोनं, ज्वारी, उडीद,मूग,चवळी तूर, सोयाबीन, मका आदी पिकांचे उत्पन्न अत्यल्प पावसाने प्रचंड प्रमाणावर घटले त्यामुळे बळीराजांचे कबंरडे मोडले गेले. शेतकऱ्यांच्या नशिबी आलेल्या गंभीर व भयावह परिस्थितीत शासनाने खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांच्या मालाला शासकीय हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू करावे तथा केंद्राचे आयात निर्यात धोरण तातडीने रद्द करावेत हिट अँड रन कायदा रद्द केला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरात अद्याप मागील व चालू वर्षाचे कापूस पडून आहे. शेतकऱ्यांच देणं घेणं थांबून गेले. अशीच गंभीर परिस्थिती असेल तर आत्महत्या कशा थांबतील. आधी शेतकऱ्यांचे व जनतेचे अति महत्त्वाचे प्रश्न घेऊन शासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन दिनांक १२ जानेवारी शुक्रवार रोजी १२:०० वाजता सौ. वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या,निळकंठ पाटील अध्यक्ष कृषी संघटना गुलाबराव पाटील, सचिन सोमवंशी राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष, विशाल बागुल वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष, प्रवीण पाटील संभाजी ब्रिगेड, जिल्हाध्यक्ष मोहन भिका पाटील ओन्ली ड्रायव्हर संघटना अध्यक्ष आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. याप्रसंगी पाचोरा भडगाव तालुक्यातून अरुण पाटील, अँड अभय पाटील, शरद पाटील, अनिल सावंत, भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, ज्ञानेश्वर चौधरी, भारत पाटील, विनोद राऊळ, हेमंत पाटील, नितीन लोहार, प्रेमचंद पाटील,विनोद बाविस्कर, दादा भाऊ चौधरी, खंडू सोनवणे, विकास वाघ, संदीप जैन, मनोज चौधरी, हरीश देवरे, चंद्रकांत पाटील, मंदाकिनी पारोचे, जयश्री येवले, अनिता पाटील, अनिल पाटील भडगांव तालुकाप्रमुख,विजय साळुंखे,रतन परदेशी,शरद पाटील,फकीरा पाटील, रविन्द्र पोपट पाटील, शामकांत पाटील,माधव जगताप, चेतन पाटील,मदन पाटील,भैय्या सुर्यवंशी,योजनाताई पाटील,सुषमा भावसार,रिना पाटील,मनिषा पाटील,सविता चौधरी, सोनाली पाटील,कल्पना पाटील,रेखा शिरसाठ शशी पाटील युवासेना तालुका अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, प्रेमचंद पाटील, आण्णा परदेशीं, अनिल परदेशीं, गणेश पाटील, जयसिंग परदेशीं, शरद पाटील सरपंच सावखेडा, सुनील परदेशीं, अरुण तांबे, रवींद्र पाटील, बालू पाटील, सुदर्शन पाटील, संजु पाटील, भाऊसाहेब पाटील, पंकज पाटील, पुडलिक जिभू पाटील, सुनील डामरे, युवराज धोबी, प्रितेश जैन, भावडू राजपूत, भिकन तडवी,बाईदास धुमाळ, रामकृष्ण पाटील,देविदास साडू पाटील, भगवान पाटील, भुषण कासार, अजय तेली, अरुण सोमवंशी, बाळू मोरे, सचिन राजपूत, भूपेश सोमवंशी, दत्तू भोई, योगेश समारे, विठ्ठल राजपूत, अतुल चौधरी सह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!