सौ.वैशालीताई सुर्यवंशी यांनी मतिमंद विद्यालयातील मुलांना गणवेश वाटून साजरा केला मकर संक्रांती सण.
पाचोरा-
श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचालित स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय, पाचोरा येथे विद्यालयांचा तमाम मुलांसोबत सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपले संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत दिनांक 15/01/2024 सोमवार रोजी सकाळी 11:00 वाजता मकर संक्रांतीचा सण साजरा केला.
मकर संक्रांतीच्या या कार्यक्रमात संस्थेचे फाउंडर प्रदीप पांडे सर आणि समस्त शिक्षक स्टाफ यांच्या कडून सौ. वैशालीताई यांचा स्वागत करण्यात आले. त्यानंतर ताईसो यांच्यावतीने विद्यालयाच्या प्रत्येक विद्यार्थीला शाळेचा युनिफॉर्म वाटप करण्यात आले.
यासोबतच ताईसो यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप करण्यात आले. त्यानंतर विद्यालयांच्या मुलांसोबत ताईने पतंग उडवण्याचा आनंद घेतला. यावेळी शाळेचे विद्यार्थी खूप खुश होते व त्यांच्या आनंदाची सीमा नव्हती, मकर संक्रांतीचा सण साजरा झाल्यानंतर विद्यालयाचे समस्त विद्यार्थ्यांनी जेवण केलं. यावेळी ताईसो आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी मुलांना आपल्या हाताने जेवण आणि मिठाई दिली, यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रमेशजी बाफना शेतकरी नेते, शरद पाटील तालुका अध्यक्ष, अनिल सावंत शहराध्यक्ष, एडवोकेट दीपक पाटील शहराध्यक्ष, भारत खंडेलवाल, राजू काळे, संजय चौधरी, द्वारकाबाई सोनवणे, संदीप जैन उपजिल्हाधिकारी, हरीश देवरे, मनोज चौधरी शहर युवाअधिकारी, जीवन भाऊ, गफार भाई, नथू सोनवणे, हरिभाऊ पाटील, राकेश सोनवणे, नितीन खेडकर, मयूर सावंत सह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते आणि स्वर्गीय कालिंदी बाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय चे सर्व शिक्षक वृंद आणि स्टाफ सदस्य उपस्थित होते.