कामायनी एक्स्प्रेस मधून पडल्याने कुणाल अहिरे यांचा प्रवासा दरम्यान दुर्दैवी मृत्यू.
पाचोरा –
पाचोरा शहरातील रहिवासी नामे कुणाल प्रकाश अहिरे (वय३८) (रा.भुसावळ हल्ली मु.नागसेन नगर, पाचोरा) हे दि.१३ जानेवारी शनिवार रोजी कामानिमित्त पाचोराहुन नाशिक येथे जात असतांना कामायनी एक्स्प्रेस ने प्रवास करीत असतांना दुपारी १७:१० वाजेच्या सुमारास पाचोरा – तारखेडा तारखेडा दरम्यान रेल्वे खंबा क्र.३६८/१८ अप जवळ रेल्वेतून पडल्याने डोक्यास जबर मार लागून घटनास्थळी मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच पाचोरा रेल्वे दुरक्षेत्र पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार यांनी अंबुलन्स सह चालक बबलू मराठे यांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व प्रकाश पाटील,संदीप पाटील यांच्या मदतीने शव ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले असुन शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटने प्रकरणी रेल्वे पोलिसात ३/२०२४,कलम १७४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून मयताजवळ आधार,पॅनकार्ड,फोटो, मोबाईल व प्रवासाचे तिकीट आढळून आले आहे. सदरील घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार करीत आहेत मयत कुणाल अहिरे यांच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी आहे.ते जळगाव तरुण भारतचे प्रतिनिधी सुरेश तांबे यांचे जावई होत.