आज होणार श्रीराम मंदिर परिसरातील दहा कोटी रुपयांच्या विकास कामाचे भुमीपुजन
पाचोरा-
आयोध्येतील भव्य प्रभु श्रीराम मंदिराच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर पाचोरा शहरातील प्राचिन कालीन श्रीराम मंदिर परिसरातिल सुशोभीकरण १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे आज २२ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता श्रीराम मंदिराचे महंत१००८परमतपस्वी विष्णुदासजी महात्यागी महाराज यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील हे असणार आहेत.
पाचोरा शहराची ओळख असलेल्या प्राचिन कालीन श्रीराम मंदिर परिसराचा सर्वांगिन विकास व्हावा आणी देशभरातुन येणार्या भाविक भक्तांना सर्व सोई सुविधा मिळाव्यात या उदात्त हेतुने आमदार किशोर पाटील यांनी शासनाच्या वैशिष्ठपुर्ण योजनेतुन १० कोटी रूपयांचा निधी मंजूर करून या परिसराचा सर्वांगिण विकास साधला आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील, मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती शोभा बाविस्कर,गजानन जोशी व शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व आजी माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
एम.एस.पी.बिल्डकाॅन चे संचालक मनोज शांताराम पाटील या शासकिय ठेकेदाराच्या माध्यमातुन या श्रीराम मंदिर परिसरातिल विकास काम पुर्ण होणार असुन या विकास कामात श्रीराम मंदिर परिसराला कंपाउंड आणी बुरूज,पार्किंग व्यवस्था,जाॅगिंग ट्रॅक,ध्यानकेंद्र,पुल,वृक्षारोपण,सभामंडप,
व्यायमशाळा,बोटींग,कारंजे,अंतर्गत रस्ते व परिसराचे सुशोभीकरण आदींसह संपुर्ण साहे सहा एकरचा परिसराचा विकास या माध्यमातुन साधला जाणार असून यामुळे शहर सौंदर्यकरणात भर पडणार आहे. तरी या कार्यक्रमास पाचोरा शहर व पंचक्रोशीतील नागरीकांनी तथा प्रभू राम भक्तांनी उपस्थित राहण्याचे अवाहन माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे यांचेसह नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.