जळगाव जिल्हा
पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी स्वीकारला पदभार.
जळगाव-
जळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी दिनांक ४ फेब्रुवारी रविवार रोजी एम राजकुमार यांच्याकडून पदाचा पदभार स्वीकारला आहे.
जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या बदलीचे आदेश दिनांक ३१ जानेवारी रोजी प्राप्त झाले होते त्यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तीपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त स्थानी जळगाव पोलीस अधीक्षक पदी बृहन्मुंबई येथे पोलीस उपायुक्त असलेले एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती आदेश शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी दिलेले होते त्या आदेशाचे पालन करत एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी ४ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.