निवडणुक प्रक्रियेत सहभागींना प्रमाणपत्र नंतरच पहिले मानधन -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव-
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्यांना
निवडणुकीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर परीक्षा घेतल्यानंतर ज्यांना प्रमाणपत्र मिळाले त्यांनाच पहिले मानधन देण्यात आले आहे. बाकीच्यांना ट्रेनिंग देऊन जोपर्यंत ते पास होत नाही तोपर्यंत त्यांचे ट्रेनिंग सुरूच राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच काही शिक्षक व अधिकाऱ्यांनी 14 प्रकारची कारणे देऊन आपले आदेश रद्द करण्यासाठी अर्ज केले होते. मात्र ट्रेनिंग नंतर अनेकांचे मन परिवर्तन झाले असून त्यांनी अर्ज मागे घेतल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 साठी जळगाव जिल्ह्यात 7 प्रकारचे ट्रेनिंग देण्यात येत आहे. या ट्रेनिंग मधून पास झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यात येते व त्यांनाच पहिले मानधन देण्यात आलेले आहे. जे या परीक्षेत नापास झालेले आहेत, त्यांना पुन्हा ट्रेनिंग देऊन परीक्षा घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 34.16 टक्के मतदान हे मुक्ताईनगर मध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनेक वेळा मतदान केंद्रप्रमुख यांनी आदेश रद्दबादल करण्यासाठी 14 प्रकारची कारणे दिले होते. यात मला दोन आदेश मिळाले आहेत. माझ्या घरी कोणी नाही. माझे मुले आजारी आहेत. मी सेवानिवृत्त झालेलो आहेत. अपंग आहे. प्रसुती रजेवर आहे, राजकीय पदाधिकारी असल्याचे या अर्जांमध्ये म्हटले होते. मात्र या सर्वांनी ट्रेनिंग घेतल्यानंतर व निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभाग घेऊन त्यांच्या शंका कुशंका दूर झाल्यानंतर अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यामधील आजारी- अपंग लोकांना मेडिकल बोर्डाकडे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे राजकीय पदाधिकारी असल्याचे अर्जात नमूद आहे, त्यांनी जोपर्यंत त्या नोंदणीकृत पक्षाचे आदेश देत नाही तोपर्यंत त्यांच्या अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.
1593 वाहनांची आवश्यकता
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी व मतदान केंद्रांवर बॅलेट युनिट हे सर्व कर्मचारी अधिकारी पोहोचण्यासाठी व काही भरारी पथकांसाठी जिल्ह्यात 1593 वाहनांची आवश्यकता पडणार आहे. यामध्ये बस 392 मिनी बस 12 जीप 23 टेम्पो,चौदा सीटर 8, टेम्पो वीस सीटर 11, क्रुझर 475 स्कूल बस 70 जीप 46 ईव्हीएम साठी 66 टीम साठी 66 रिझर्व 66 असे एकूण 1593 वाहने लागणार आहेत व त्यांची नियोजन करण्यात आल्याची माहिती दिली.
जिल्ह्यातील एकोणावीस नगरपरिवार नगरपरिषद व तसेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायती यांना प्रत्येक वार्डात प्रत्येक विभागामध्ये मुख्य रस्त्यांच्या ठिकाणी क्यू आर कोड लावण्याचे सांगण्यात आलेले आहेत. या क्यू आर कोड च्या माध्यमातून मतदार आपले नाव मतदान यादीत आहे की नाही याची तपासणी करू शकणार आहेत. आजपर्यंत या क्यूआर कोड मधून 25000 मतदारांनी त्यावर वेबसाईटवर जाऊन आपल्या नावा आहे की नाही याची खात्री केलेली आहे.




