जळगाव जिल्हा

एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या जोरदार प्रचार सुरू..


पाचोरा-

जळगाव लोकसभा निवडणूक 2024 प्रक्रिया सुरू झाली आहे.आणि प्रचार हि शिंगेला पोहचला आहे.
आदिवासी भिल्ल समाजाचे प्रश्न, समस्या व त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचून त्या पूर्ण करण्यासाठी लढा, आंदोलन, मोर्चे, निवेदने यांच्या माध्यमातून एकलव्य आदिवासी संघटनेने सोडवलेले आहेत. एकलव्य संघटनेचे एकमेव ब्रीद आहे की, समाज पुढारला पाहिजे, समाज पुढे गेला पाहिजे,
आतापर्यंत अनेक सरकारे आपण पाहिलेत.

पण कुठलेही सरकार समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी अनुकूल नव्हती. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देश पातळीवर व राज्य पातळीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखरजी बावनकुळे व गिरीश भाऊ महाजन यांच्यासारख्या नेतृत्वामुळे आदिवासी भिल्ल समाजाची प्रश्न व्यवस्थेच्या केंद्रस्थानी येऊन, या प्रश्नांना न्याय देण्याचे काम भाजपा सरकारने केले.
धरणगाव येथे ख्वाजा सिंग भिल्ल यांच्या स्मारकासाठी 15 ते 20 कोटी रुपयांचा निधी सरकारने दिला, त्याचे काम सुरू आहे. इयत्ता पहिली ते बारावी मधील आदिवासी मुलांसाठी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत ज्या ठिकाणी 50 टक्के वस्ती होती त्याच ठिकाणी ही योजना लागू केली जायची मात्र भाजपा सरकारने आता सरसकट आदिवासी भिल्ल समाजाच्या वस्ती जिथे असतील, तिथे ही योजना लागू केलेली आहे. या योजनेअंतर्गत छोटी मोठी प्रत्येक वस्ती रस्ते व पायाभूत सुविधा उभ्या करून सुधारली जात आहे. शबरी घरकुल योजनेसाठी पूर्वी एका तालुक्याला 15 ते 20 घरकुलचे टार्गेट दिले जायचे, मात्र आत्ता जवळपास 400 ते 500 घरकुलांचे टार्गेट तालुकास्तरावर दिले जात आहे. चाळीसगाव तालुक्यात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून आदिवासी भिल्ल वस्तींमध्ये १४ एकलव्य भवन उभारण्यात येत आहे. हे सर्व शक्य झाले ते फक्त भाजपा सरकारच्या सबका साथ व सबका विकास या दृष्टिकोनामुळे. या बाबीचा विचार करुन एकलव्य आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.पवनराजे सोनवणे,व प्रदेश कार्याध्यक्ष श्री सुधाकरभाऊ वाघ यांनी भाजपाला जाहिर पाठिंबा दिला आहे.

त्याच अनुषंगाने पाचोरा तालुक्यामधून महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना एक लाखा पेक्षा जास्त मताधिक्य कसे मिळेल यावर लक्ष देत एकलव्य आदिवासी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने महायुतीच्या प्रचार पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन करत आहेत.या दोन दिवसात एकलव्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी

तारखेडा,चिंचाळेगाळण,बाळद,लोहटार,निपाणे, नगरदेवळा,सार्वे,भराडी,नाचणखेडा,नेरी वडगाव,भोरटेक,टाकळी,बाबंरुड,ओझर,अंतुर्ली खु, पाचोरा जवळील खारवण, या ठिकाणी जाऊन आदिवासी समाज बांधवांची भगिनींची भेट घेऊन महायुती भाजपाचे उमेदवार स्मिताताई वाघ यांची निशाणी कमळ समोरील बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन करत जोरदार प्रचार केला,सदरचा प्रचार प्रदेश कार्याध्यक्ष श्री सुधाकर भाऊ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष गणेश वाघ, संतोष महाले,बबन,मोरे,संजय गायकवाड, आकाश वाघ,कौतिक ठाकरे,संजय महाले, विशाल कुमावत, यांच्या सह पदाधिकारी होते.

सदरच्या प्रचारा दरम्यान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाज बांधवांसाठी कोणत्या योजना सुरू केल्या आहेत त्याबाबत ही पुर्ण माहिती देण्यात येत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!