जळगाव जिल्हाशैक्षणिक

पिटीसीने राखली यशाची परंपरा!
एम.एम.महविद्यलयाचा  ९४.८९% निकाल

पाचोरा-

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या विविध उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली असून संस्थेच्या विविध उच्च माध्यमिक विद्यालयांचा एच.एस.सी. परीक्षेचा उत्कृष्ट निकाल जाहीर झाला आहे.
श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाचा निकाल 94.89% इतका जाहीर झाला एकूण 822 विद्यार्थ्यांपैकी 780 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संस्थेच्या विविध महाविद्यालयांचे निकाल पुढील प्रमाणे जाहीर झालेले आहेत-
एस.एस.एम.एम.महाविद्यालय,पाचोरा
विज्ञान शाखेचा 99.50% ,वाणिज्य शाखेचा 99.01% तर कला शाखेचा 89.45% इतका निकाल जाहीर झाला असून शाखानिहाय गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे-
विज्ञान-
प्रथम- कंखरे भावेश शशिकांत 91%, द्वितीय विसपुते सिद्धम धीरज 88.83% तृतीय पाटील वैभव संजय 88.33%
वाणिज्य शाखा प्रथम सावंत सुषमा रमेश 80.67% द्वितीय लिंगायत राधिका सतीश 79% तृतीय वाघ  जान्हवी सुरेश 78.50 % साहित्य शाखा जाधव चंचल कांतीलाल 81.17 % द्वितीय देहडे पल्लवी महेंद्र 76.83 %तृतीय पाटील यतीका उमेश 75%
व्यवसाय अभ्यासक्रम-या विभागाचा शंभर टक्के निकाल जाहीर झाला असून मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट-प्रथम सपकाळे करुणा रघुनाथ 69.83% मेडिकल लॅब टेक्निशियन प्रथम वाघ प्रेरणा बहिरम 63.67%अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट निकम अभिजीत उत्तम 60.67%
एम सी व्ही सी- या विभागातून मेकॅनिकल मेंटेनन्स विभागात कंखरे भावेश शशिकांत याने 91 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.
गो से हायस्कूलच्या एम सी व्ही. सी चा निकाल देखील 92.50% इतका जाहीर झालेला आहे.

सौ.सु.गि.पाटील माध्यमिक विद्यालय,सौ.ज.ग पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम उच्च माध्यमिक विद्यालय

भडगाव येथील सौ.सु.गि.पाटील माध्यमिक विद्यालय,सौ.ज.ग पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान विभागाचा एच एस सी परीक्षेचा शंभर टक्के निकाल जाहीर झाला प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे-
प्रथम क्रमांक महाजन भैरवी महेंद्र-८९.६७% द्वितीय क्रमांक जोशी सानिका मंगेश -८६.५०% तर तृतीय क्रमांक पाटील ईश्वरी प्रकाश-८५%
कला विभाग- प्रथम क्रमांक- कोळी निकिता रावण ७२.१७%, द्वितीय क्रमांक पाटील सचिन नाना-७१.१७% तृतीय क्रमांक पुजारी प्रीती विजय-७१%
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग-
प्रथम क्रमांक-इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी-शिंदे मयूर भोलेनाथ,इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी-कासार ज्ञानदीप प्रमोद,
अकाउंट मॅनेजमेंट-शिंदे वैष्णवी राजेंद्र

श्री. गो.से. हायस्कूल एच. एस. सी. व्होकेशनल ( किमान कौशल्य) विभाग

श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथील एच. एस. सी. व्होकेशनल(किमान कौशल्य) विभागाचा एकूण निकाल 97.61 टक्के लागला असून एकूण 42 विद्यार्थी परीक्षेत बसले होते यापैकी पैकी 41 विद्यार्थी पास झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी ट्रेडचा निकाल100%, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ट्रेडचा निकाल 100% ,इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी ट्रेडचा निकाल 93.33 ,असा ट्रेड निहाय निकाल लागला आहे.  विद्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विषयात परदेशी भावेश तुळशीराम हा विद्यार्थी प्रथम असून इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या ट्रेडमध्ये डोडवानी मोहित हिरालाल तर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात पाटील स्वप्निल हरिश्चंद्र हा विद्यार्थी प्रथम आला आहे.

डॉ.राम मनोहर लोहिया उच्च माध्यमिक महाविद्यालय बांबरुड
या उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 91.89% जाहीर झालेला आहे. या उच्च माध्यमिक विद्यालयातून अवघडे सविता पांडुरंग ही विद्यार्थिनी 77.67% गुणांसह प्रथम आलेली आहे.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो.दिलीप ओंकार वाघ,चेअरमन नानासो संजय ओंकार वाघ, मानस सचिव दादासो. ॲड.महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासो. व्ही. टी.जोशी, स्थानिक समिती चेअरमन अण्णासाहेब दगाजीराव वाघ, आबासो. श्री. दत्तात्रय पवार, बाबासो. श्री. विनय जकातदार, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम चेअरमन नानासो. श्री. विजय देशपांडे,नानासाहेब सुरेश देवरे, दादासाहेब प्रा.सुभाष तोतला, दादासो. खलिल देशमुख,अण्णासो वासुदेव महाजन यांचे सह सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!