जळगाव जिल्हा

जळगांव-रावेर लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण-मतमोजणी कक्षात मोबाईलवर सक्ती बंदी


जळगांव-

जळगांव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची मतमोजणी दि.४ जून रोजी होणार आहे.मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून ४ जून रोजी सकाळी ७ वाजता मतदान यंत्र ठेवलेले सुरक्षा कक्ष उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात येईल.
८ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडणार असल्याने उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
गुरुवार दि.३० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.या वेळी रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे ,उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया समजावून सांगितली. ४ जून रोजी सकाळी ७ वाजता मतदान यंत्रणांचे सील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधींसमोर उघडण्यात येईल.मतमोजणी स्थळी तीन पदरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे.मतमोजणी स्थळी प्रवेश करण्यासाठी उमेदवारांना ओळखपत्र बंधनकारक असणार आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही मतमोजणी स्थळी प्रवेश मिळणार नाही.मतमोजणी कक्षात मोबाईल फोन आणण्यास बंदी असल्यामुळे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधीना मोबाईल आणता येणार नाही याची नोंद घ्यावी असेही जिल्हाधिकारी यांनी या वेळी सांगितले.उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधीं समोर सर्व मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने उमेदवारांनी त्यांचे कार्यकर्त्याना शांतता राखण्याचे आवाहन करावे असेही जिल्हाधिकारी यांनी या वेळी सांगितले.प्रत्यक्ष मतमोजणी सुरु होण्याआधी टपाली मतमोजणी होणार आहे.किमान एक फेरी २० मिनिटांची असणार आहे. उमेदवारांना निवडणूकीचा अंतिम खर्च निकालानंतर ३० दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक आहे.या साठी २७ जून रोजी अल्पबचत भवन येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.तर ३० जून रोजी खर्चाचा अंतिम ताळमेळ घेतला जाणार आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!