नगरदेवळा येथे दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार मान्यवरांनी केले मार्गदर्शन.
पाचोरा-
नगरदेवळा मुस्लिम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड यांच्यावतीने दहावी व बारावी कला, विज्ञान व किमान कौशल्य शाखा मध्य गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच विविध क्षेत्र मध्ये आपला व आपले गावचे नाव रोशन करणारे विद्यार्थ्यांचे सत्कारा साठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पवार विद्यालयाचे चेअरमन शिवनारायण जाधव उपस्थीत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरदेवळा मुस्लिम सोसायटी चेअरमन अब्दुल गनी शेख उपस्थित होते. मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विषेश मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी केले. कार्यक्रमाचे उद्दिष्ट शेख अन्सार यांनी मांडले. मान्यवरांचे हस्ते ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्र मध्ये उत्तम कार्य करणारे शिक्षक शेख जावेद रहीम यांच्या आदर्श शिक्षक म्हणून तसेच मतीन शेख मुख्तार यांचा डिफेन्स सेवा मध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये सिलेक्शन झाल्याने तसेच डॉक्टर मुसैफ बागवान यांचे यावेळी सत्कार करण्यात आला.सदरचा कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी मुस्लिम सोसायटीचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले. पवार विद्यालय मध्ये उर्दु शिक्षकाचे रिक्त पदे लवकरच भरण्यात येईल असे आश्वासन अध्यक्ष शिवनारायण जाधव यांनी दिले.कार्यक्रमात मुस्लिम सोसायटीचे सदस्य हबीब खान, अन्सार शेख, हकीम आजम, सिकंदर पिंजारी, सादिक अली, अन्सार बेग, निहाल मनियार, उमर बेग, फरीद खान, गुलाम गोस बागवान, नूर चैअसरमन,कादर बागवान, आले मुस्तफा, मोज्जीन शेर मोहम्मद,नूर चैरमन, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसीम शेख, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शेख अफरोज आणि मोठी संख्या मध्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते. शेख अब्दुल गनी यांनि आभार व्यकत केले.