शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात ‘इनकमींग’राष्ट्रवादीला खिंडार; शिंदाड येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचा प्रवेश
पाचोरा-
दिनांक २०/०६/२०२४ शिवसेना-उध्दव
बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग
सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज तालुक्यातील शिंदाड येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी पक्षात प्रवेश घेतला असून यामुळे परिसरात पक्षाची ताकद वाढली आहे.
सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर
राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. या अनुषंगाने
शिंदाड येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या पदाधिकार्यांनी आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला आहे. यात प्रामुख्याने प्रदीप बोरसे, किरण रामकृष्ण पाटील, निसार बेग गनी बेग, सलीम नूर मोहंमद
शेख, आलमखा राजेखा पठाण, समाधान गणपत पाटील,रवींद्र भास्कर पाटील, किरण अशोक पाटील, सुभाष गणपत सुतार, निसार बेग गनी बेग, सलीम नूरमोहंमद शेख, प्रदीप बाबूलाल परदेशी (गदरभाऊ) आणि विजयसिंग संतोष राजपूत आदींचा समावेश आहे. हे सर्व मान्यवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे पदाधिकारी असल्याने या माध्यमातून राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे.
आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी या सर्वांचे स्वागत केले. पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकार्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदाडसह परिसरातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार केला. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
याप्रसंगी, वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, उध्दवराव मराठे,अरूण पाटील, शरद पाटील, अरूर तांबे, राजू काळे, अभय पाटील, भारत परदेशी, गोकुळ परदेशी, कैलास परदेशी, बबलू परदेशी, रवींद्र पाटील, पुंडलीक पाटील, शशीकांत पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.